कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिन्ही हत्यांच्या तपासातील पुंगळ्या (काडतुसे) इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. ‘सीबीआय’ने अर्ज करून त्यासंबंधी परवानगी मागितली होती. त्यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी बुधवारी मंजुरी दिली. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात २० मे रोजी दोषारोपपत्र निश्चित करण्यात येणार आहे. समीरविरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याच्या निर्णयावर बुधवारी सुनावणी झाली. ‘पानसरे हत्येप्रकरणातील पाच पुंगळ्या तपासण्यासाठी मंजुरी द्यावी, असा अर्ज सत्र न्यायालयाकडे केला होता. त्यास न्यायाधीश बिले यांनी मंजुरी दिली. त्यानुसार, पानसरे हत्येप्रकरणातील पाच, डॉ. दाभोलकर व कलबुर्गी प्रत्येकी दोन अशा नऊ पुंगळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
समीरविरोधात २० मे रोजी दोषारोपपत्र
By admin | Updated: May 5, 2016 01:21 IST