शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

बलात्कारप्रकरणी दोघांना २0 वर्षांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 20:07 IST

ळवून नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना प्रत्येकी २0 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

सांगली,  दि. २३  : पेठ (ता. वाळवा) येथे तेरा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीस मोटारसायकलवरून पळवून नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना प्रत्येकी २0 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. या न्यायालयात फाशीनंतर दिलेली सक्तमजुरीची ही सर्वात मोठी शिक्षा ठरली.

प्रवीण ऊर्फ खन्ना पावलस वायदंडे (वय २८) आणि अभिजित ऊर्फ रोहित चंद्रकांत पवार (२१, दोघे रा. पेठ) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. घटनेनंतर फिर्याद दाखल होण्यास २८ दिवसांचा विलंब होऊनही अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश पाटील (बोरगावकर) यांनी आरोपींना जन्मठेपेपेक्षा जास्तीची शिक्षा घेण्यात यश मिळविले. या खटल्यातून एका अल्पवयीन संशयिताची मुक्तता झाली आहे.

सामुदायिक बलात्काराची ही घटना २0 मार्च २0१५ रोजीच्या रात्री घडली होती. पंधरा वर्षांची पीडित मुलगी घटनेदिवशी रात्री औषध आणण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. औषध घेऊन ती घरी परतत असताना अल्पवयीन साथीदारासह प्रवीण वायदंडे आणि अभिजित पवार यांनी तिला, घरी सोडण्याच्या बहाण्याने सोबत घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने नकार दिल्याने तिघांनी तिला जबरदस्तीने उचलून मोटारसायकलवर बसवले. तिचे तोंड दाबून, तिला महादेववाडी रस्त्यावरच्या शेतात नेले. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर घरच्यांना ठार मारण्याची धमकी तिला दिली आणि त्यांनी तेथून पलायन केले.

पीडित मुलगी भयभीत अवस्थेत घरी आली. तिने हा प्रकार घरी सांगितला नाही. त्यामुळे पुन्हा शाळेला जाता—येता हे तिघे तिला धमकावत होते. शेवटी त्रास असह्य झाल्यावर तिने हा प्रकार मैत्रिणीस सांगून आईपर्यंत पोहोचवला. त्यानंतर तिने कुटुंबियांसमवेत येऊन या तिघांविरुध्द फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचा तपास करून एक अल्पवयीन संशयित वगळता इतर दोघांविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.

न्या. कुलकर्णी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. हवालदार बाबूराव पाटील, संजय पवार यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले. 

अवघ्या १३ महिन्यांत निकालही घटना २0 मार्च २0१५ रोजी घडली. त्यानंतर २८ दिवसांच्या विलंबाने १७ एप्रिल रोजी पीडित मुलीने फिर्याद दिली. पोलिसांनी दोन महिन्यांच्या तपासानंतर दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने या खटल्याची सुनावणी सुरू करून अवघ्या १३ महिन्यात यातील दोघांना २0 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जन्मठेपेपेक्षा जास्त शिक्षाया खटल्यातील अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश पाटील (बोरगावकर) गेल्या १६ वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत. येत्या २५ आॅगस्टरोजी त्यांचा सेवा कालावधी संपत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला दोघा आरोपींना जन्मठेपेपेक्षाही जास्त कालावधीची २0 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा लावण्यात त्यांनी यश मिळविले.