शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

२० वर्षांच्या भोंदूबाबाचा पर्दाफाश

By admin | Updated: October 12, 2016 20:24 IST

अवघे २० वर्ष वय असलेल्या युवकाने ‘भोंदू बाबागिरी’ करत शहादा शहरातील अनेकांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शहादा

ऑनलाइन लोकमत

शहादा, दि. 12 - अवघे २० वर्ष वय असलेल्या युवकाने ‘भोंदू बाबागिरी’ करत शहादा शहरातील अनेकांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शहादा शाखेने शहरातील विजय नगर भागात राहणारा भोंदू बाबा पोलिसांना पकडून दिला होता़ यावेळी या २० वर्षीय बाबाला पाहून पोलीसही आवक झाले होते.शहादा शहरातील विजय नगर भागातील उद्धव दामू पाटील यांचे घर गेल्या तीन महिन्यांपासून चार युवकांनी भाड्याने घेतले होते़ यातील तीन जण शहरातील विविध भागात पत्रक वाटप करत होते़ यात बाल ब्रह्मचारी बलवंत महाराज यांच्या नावांची ही पत्रके होती़ यातून बलवंत महाराज हा विवाह समस्या, नोकरी समस्या, पितृदोष, भविष्य, आर्थिक समस्या, मूलबाळ न होणे यासारख्या विविध गोष्टी तडीस लावून देण्याचा दावा करीत होता़ गेल्या तीन महिन्यापांसून हा प्रकार शहादा शहारात सुरू होता़ १६ ते १८ वयोगटातील तीन युवक आणि भोळ्या भाबड्या महिलांना मार्गदर्शनाच्या नावाखाली गंडा घालणारा २० वर्षीय बलवंत महाराज हा युवक अशी चौकडी परिसरात प्रसिद्धीस पावली होती़ त्यांच्या या कारनाम्यांची माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य सचिव विनायक सावळे यांना मिळाली़ त्यांनी घटनास्थळी जाऊन भोंदू युवकाची भेट घेतली असता़, त्यांना संशय आला़ यावरून त्यांनी डमी ग्राहक व भोंदू बाबा यांच्यात संभाषण घडवून आणत बाबाचे पितळ उघडे पाडले़ या भोंदू बाबाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असता, पोलीसांनी भोंदू बाबा बळवंत यास थेट पोलीस ठाण्यात आणल्यानंतर, त्याने भोंदूपणा करत असल्याची कबुली देत, यानंतर असे करणार नाही, असा लेखी माफीनामा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना दिला आहे.दरम्यान माफीनामा देऊन शहादा शहर सोडून जामनेर येथे गेलेला हा बाबा तेथील टोळीचा सदस्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ या टोळीतील अशा एका २० वर्षीय भोंदूबाबावर सातारा येथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती अंनिसने दिली आहे.

- तीन महिन्यांपासून शहाद्यात बऱ्यापैकी प्रस्थ निर्माण करणाऱ्या बलवंत महाराज याचे खरे नाव दिलीप सुरेश जोशी असे आहे़ तो जामनेर शहरातील डोंगरीनी महाराज नगरातील रहिवासी आहे़ तीन महिन्यांपूर्वी तो त्याच्या सोबतच्या तीन युवकांसह शहाद्यात आला होता़ बलवंत महाराज नावाची पत्रके छापून ‘कार्यसिद्धी’ यज्ञ करून सर्व समस्यांमधून मुक्ती मिळवून देण्याचा दावा तो करत होता़ त्याच्या या दाव्यावर भाडून अनेक जण त्याच्या नादाला लागल्याची माहिती आहे़ यात प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर यांच्यासह काही उच्चशिक्षित व्यक्तींचा समावेश आहे़ खासकरून महिलांसाठी त्याने यंदाच्या नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावरून देवीच्या वापरलेल्या साड्या आणि दागिने मिळवून देतो़ असे अमिष दाखवत लूट चालवली होती़ १०० रूपयांपासून १५ हजार रूपयांपर्यंतच्या विविध समस्यानिवारणाचे त्याचे रेटकार्ड होते़ यानुसार त्याने तीन महिन्यात अनेक जणांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.- जोशी याने भाड्याने घेतलेल्या खोलीवर पोलीस त्याला घेण्यासाठी गेले असता, त्यावेळी त्याठिकाणी नाशिक शहरात डॉक्टरकी करणारी व्यक्ती सहकुटूंब उपस्थित होती़ त्यासोबतच शहरातील काही महिला समस्या घेऊन आल्याचे दिसून आले होते. पोलीसांना पाहताच ते सर्व गर्भगळीत होऊन तेथून बाहेर पडले होते.