शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

महानंदच्या २० जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2016 01:12 IST

बहुचर्चित महानंद दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ६७ अर्जांपैकी अनेकांनी अर्ज मागे घेतल्याने २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

- अतुल कुलकर्णी,  मुंबईबहुचर्चित महानंद दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ६७ अर्जांपैकी अनेकांनी अर्ज मागे घेतल्याने २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यात बिनविरोध निवडून आले आहेत.निवडणुकांच्या संदर्भात महसूलमंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी बैठका झाल्या. जर हरिभाऊ बागडे यात राहणार असतील, तर संचालक मंडळावर दबाव राहील आणि यापुढे तरी काम निट पार पडेल, असा सूर त्यात निघाला. राज्यात महानंदचे ८ मतदारसंघ आहेत. त्यातून २१ उमेदवार निवडून येतात. एकूण मतदार ६२ आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीचे ३० ते ३२ तर काँग्रेसचे १५ ते १६, भाजपाचे १० ते १२ शिवसेनेचे २ व तटस्थ अशी विभागणी होती. पश्चिम महाराष्ट्रात ११ अर्जांमध्ये चार वगळता सगळ्यांनी अर्ज मागे घेतल्याने विष्णू हिंगे, ज्ञानेश्वर पवार, पाटील विनायक धोंडिबा, जगदाळे शंकरराव बिनविरोध निवडून आले.मराठवाड्यातील चार जागांसाठी ११ अर्ज आले होते. त्यात हरिभाऊ बागडे, राजेंद्र सूर्यवंशी, रामकृष्ण बांगर, विलास बडगे बिनविरोध आले तर विदर्भातील चार जागांसाठी ८ अर्ज होते. त्यात चौघांनी अर्ज मागे घेतल्याने निळकंठ कोडे, राजेंद्र ठाकरे, दयाराम कापगते आणि विलास काटेखाये बिनविरोध आले.उर्वरित महाराष्ट्रातील चार जागांसाठी १३ अर्ज आले होते. त्यापैकी ९ अर्ज मागे घेतले गेल्याने प्रशांत गडाख, विक्रमसिंह रावळ, चंद्रकांत रघुवंशी, राजेश परजणे बिनविरोध आले तर महिलांसाठीच्या दोन जागांसाठी ८ अर्ज होते. त्यातील ६ अर्ज मागे घेतले गेले व प्राजक्ता सुरेश धस आणि मंदाकिनी खडसे बिनवरोध निवडून आल्या.- एसटीसाठीच्या एका जागेवर वैभव पिचड तर ओबीसीच्या एका जागेसाठी १० अर्ज आले होते त्यातून नऊ अर्ज मागे घेतले गेल्याने रणजितसिंह देशमुख विजयी झाले. व्हीजेएनटीच्या एका जागेसाठीचा तिढा सुटला नव्हता.