अकोला : नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक यादवीमुळे अन्य ठिकाणच्या ग्रामीण भागांप्रमाणेच, अकोला जिल्ह्यातील धाबा गावालाही काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्यावर मात करीत या ग्रामस्थांनी डिजिटल अर्थव्यवस्थेकडे प्रस्थान ठेवले आहे. ७५ टक्क्यांहून अधिक जनता साक्षर असल्यामुळे, तसेच इंटरनेट सुविधाही चांगली असल्यामुळे ग्रामस्थांना तांत्रिक अडचणी सोडविणे, काहीसे सोपे होत आहे. ग्रामस्थांचा नव्या व्यवहार पद्धतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत गावातील सुमारे २० टक्के व्यवहार कॅशलेस झाला आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची आशाही आहे.गाव : धाबा तालुका : बार्शीटाकळी, जिल्हा : अकोला जिल्ह्याच्या ठिकाणापासूनचे अंतर : ३० किमी बँकांची संख्या : ३पोस्ट आॅफिस : आहे एटीएमची संख्या : २ वाहतूक सुविधा : (एसटी बस) - अकोला ते धाबा पाच बस फेऱ्ऱ्या आहेत.इंटरनेट सुविधा : आहेकनेक्टिव्हिटी : अतिशय चांगलीवीजपुरवठा : अखंड. भारनियमनमुक्त गावकॅशलेस व्यवहार : २० टक्के दोन महिन्यांत डिजिटल व्यवहार / कॅशलेस व्यवहार वाढले आहेत का? : हो. ई-महा सेवा केंद्र आणि काही दुकानांमध्ये पॉस मशिन65%स्मार्ट फोनधारक 75%साक्षरताकॅशलेस पद्धती योग्य आहे. ती पूर्णत: लागू झाल्यानंतर अडचणी कमी होणार आहेत. डिजिटल साक्षरता ही येणाऱ्या काळाची गरज बनणार आहे.- गजानन गालटसुट्या पैशांकरिता अडचणीचा सामना करावा लागत आहे. व्यवहार सुरळीत होण्यासाठी कॅशलेस हाच योग्य पर्याय आहे. मी ‘पॉस’ मशिन मागवली आहे. - रामेश्वर शेळके, मेडिकल व्यावसायिकदोन हजारांचे सुटे मिळत नाहीत. दुसरीकडे बँकांच्या व्यवहारामुळे ग्राहक चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे यातून सुटका होण्यासाठी कॅशलेसचा वापर वाढणे गरजेचे आहे. - डॉ. स्वप्निल देशमुख.नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकरी, मजूर व सामान्य जनतेला बसला असून, याकरिता कॅशलेस पद्धतीने डिजिटल व्यवहार व्हावे, तरच ही समस्या सुटेल. -अजय टापरे.काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने जाहीर केलेली कॅशलेस पद्धती अभिनंदनास पात्र आहे. या पद्धतीने सर्वांनी कॅशलेस व्यवहार केले पाहिजे. - जीवन हातोले.
२० टक्के व्यवहार ‘कॅशलेस’
By admin | Updated: January 1, 2017 02:24 IST