शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

वीस डॉक्टरांचे निलंबन, चार पॅथालॉजिस्टचे परवाने रद्द,  महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:55 IST

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी नुकताच वीस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या डॉक्टरांनी अतिरिक्त पदवी रजिस्ट्रेशनसाठी बोगस कागदपत्र वैद्यकीय परिषदेकडे सादर केली होती. त्याचप्रमाणे चार पॅथोलॉजिस्टचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी नुकताच वीस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या डॉक्टरांनी अतिरिक्त पदवी रजिस्ट्रेशनसाठी बोगस कागदपत्र वैद्यकीय परिषदेकडे सादर केली होती. त्याचप्रमाणे चार पॅथोलॉजिस्टचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत.वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही बोगस डॉक्टरकी करणाऱ्यांवर कारवाईसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने राज्यातील डॉक्टरांची वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी सुरू केली होती. या तपासणीत अतिरिक्त पदवी रजिस्ट्रेशनसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणाºया राज्यातील २० डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली.यासंदर्भात परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले की, बनावट कागदपत्र दाखवून एमएमसीकडून अतिरिक्त पदवी परवाना मिळवणाºया मुंबईसह महाराष्ट्रातील २० डॉक्टरांवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले. अशाप्रकारचे आणखी काही डॉक्टर्स आहेत, मात्र त्यांच्या कागदपत्रांच्या छाननी व तपासणीचे काम सुरु आहे. याशिवाय, पॅथालॉजिस्टवर करण्यात आलेल्या कारवाईविषयी डॉ. उत्तुरे यांनी सांगितले की, अनेकदा पॅथोलॉजिस्टच्या जागी प्रयोगशाळांमध्ये काम करणारे तंत्रज्ञ रुग्णांच्या वैद्यकीय चाचणी अहवालावर सही करतात.मात्र आताच परिषदेने चार प्रयोगशाळांवर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला आहे. गेल्या पाच वर्षांत आमच्याकडे १४०० तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ६५० प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टर