शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील रस्ते कामांसाठी २ लाख कोटी उभारणार; बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 05:32 IST

सध्या बांधकाम विभागाचे प्लॅन आणि नॉन प्लॅन असे बजेट प्रोव्हिजन सुमारे १२ ते १५ हजार कोटींच्या आसपास आहे.

विशाल सोनटक्केनांदेड : राज्यातील प्रमुख रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी पुढील तीन-साडेतीन वर्षे विशेष कार्यक्रम राबवावा लागणार आहे. यासाठी बाहेरून दीड ते दोन लाख कोटी  रुपये उभारण्याचा प्रयत्न असून यासाठीची प्राथमिक चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. ते सोमवारी खास ‘लोकमत’शी बोलत होते.

सध्या बांधकाम विभागाचे प्लॅन आणि नॉन प्लॅन असे बजेट प्रोव्हिजन सुमारे १२ ते १५ हजार कोटींच्या आसपास आहे. या निधीमध्ये राज्यातील कामांना गती मिळू शकत नाही. त्यातच जिल्हा परिषदेकडील रस्ते बांधकाम विभागाकडे घ्यावेत, अशी मागणी होत असते. अशा स्थितीत वेळेत दर्जेदार कामे करण्यासाठी बाहेरून निधी उभारावा लागणार आहे. 

एशियन डेव्हल्पमेंट बँकेच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातून राज्य, प्रमुख जिल्हा, तीर्थक्षेत्र तसेच राज्यातील महत्त्वाचे स्थान असलेेले रस्ते करण्याचा प्रयत्न आहे. ज्या जिल्ह्यात कामे झाली नाहीत तेथे अधिकचा पैसा देऊन बॅलेन्स डेव्हलपमेंटचा प्रयत्न असल्याचेही चव्हाण म्हणाले. कोरोनाच्या काळात केवळ ३० टक्केच पैसा सरकारच्या तिजोरीत आला. या ३० टक्क्यातील साधारण ७५ टक्के रक्कम आरोग्य सेवेसाठी वर्ग करावी लागली. आता परिस्थिती बदलत असून राज्यातील रस्ते कामाला वेग देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राने भूमिका घ्यावीआरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रापुरता नाही. हरियाणा, राजस्थानसह इतर राज्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत. हे सर्व प्रश्न एकत्रितरित्या घ्यायला हवेत. यासाठी आता केंद्राने भूमिका घेण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या प्रश्नी पहिल्यांदाच नोटीस बजावली आहे. पंतप्रधानांनी केंद्राच्या अधिकाऱ्यांना याबाबत दिशानिर्देश देऊन हा प्रश्न अंतिमरित्या मार्गी लावावा असे आवाहनही चव्हाण यांनी केले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण