भालचंद्र जुमलेदार
ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. १९ - गोव्यावरून मुंबईच्यादिशेने चाललेल्या एक कंटेनरसह २ कोटी रुपयाची विदेशी बनावटीची दारू राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने पनवेल येथे गुरुवारी उशिरा रात्री पकडली. गुरुवारी मध्यरात्री 2 च्या आसपास हि कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एक क्लीनरला अटक करण्यात आली आहे. वाहन चालक फरार असून त्याचा शोध सुरु आहे.