शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

आश्चर्यच! २.२६ कोटींचा पूल पडला २४४ कोटींत, आणखी २७७ कोटी माेजावे लागण्याचीही शक्यता

By राजेश भोजेकर | Updated: August 23, 2022 10:29 IST

लांबत गेलेल्या आणि अपूर्णावस्थेतील प्रकल्पांच्या खर्चाचे फुगलेले आकडे ही नवलाची बाब राहिली नाही.

राजेश भोजेकरचंद्रपूर :

लांबत गेलेल्या आणि अपूर्णावस्थेतील प्रकल्पांच्या खर्चाचे फुगलेले आकडे ही नवलाची बाब राहिली नाही. मात्र, महाराष्ट्र शासनाने तयार झालेल्या सव्वादोन कोटींच्या पुलासाठी कंत्राटदाराला थोडेथोडके नव्हे, तर चक्क २४४ कोटी मोजल्याचे गंभीर प्रकरण उजेडात आले आहे.   कंत्राटदाराच्या चलाखीमुळे आणि लवादाच्या निवाड्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कसा अडकत चालला याचे हे अफलातून उदाहरण. अद्यापही न्यायालयीन लढाई सुरू असून, निकाल कंत्राटदाराच्या बाजूने लागल्यास त्याला पुन्हा २७७ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

‘बीओटी’ तत्त्वावर बांधलेला पूल‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. १ ऑक्टोबर १९९७ रोजी बांधकामाचा आदेश निघाला. २१ ऑक्टोबर १९९८मध्ये पूल पूर्ण झाला. २० ऑक्टोबर १९९८ पासून ६१ महिन्यांसाठी पथकर वसुली सुरू करायची होती. मात्र, ती १० फेब्रुवारी १९९९ पासून सुरू झाली. वसुलीची मुदत ९ महिने ७ दिवसांनी वाढवून दिली. 

वाढता वाढता वाढे... - कंत्राटदार लवादाकडे गेला. ४ मार्च २००४ रोजी लवादाने २५ टक्के चक्रवाढ व्याजानुसार ५.७१ कोटींचा दावा मान्य केला. त्याला विभागाने न्यायालयात आव्हान दिले. - डिसेंबर २००६ मध्ये न्यायालयाने सरळव्याजाने १८ टक्के हा दर निश्चित केला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले. फेब्रुवारी २००७ मध्ये वसुलीची रक्कम १०.८२ कोटींच्या घरात गेली. पैकी ५० टक्के रक्कम उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जानेवारी २००८ मध्ये जमा केली. - कंत्राटदाराने त्याची उचल केली. दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी सत्र न्यायालयाने पूर्वीचा दर रद्द करून लवादाच्या निर्णयानुसार २५ टक्के चक्रवाढ व्याजाने कंत्राटदाराला रक्कम देण्याचे मान्य केले. मग विभागाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने लवादाने जाहीर केलेली दि. ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत गृहीत धरलेली रक्कम तीन महिन्यांत देण्याचा आदेश दिला. मात्र, कंत्राटदाराने पुनर्विचार याचिका दाखल केली. - आठ महिन्यांची मुदतवाढ मिळाली नाही तर कंत्राटदाराला २७७ कोटी अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे.

टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणुक 2022