शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

1993 खटल्याचा दुसरा टप्पा, आणखी दोघांना फाशी; अबू सालेमला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 04:55 IST

मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील दुसºया टप्प्याचा निकाल गुरुवारी तब्बल २४ वर्षांनी लागला. आरोपी फिरोज खान व ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या या दोघांना विशेष टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली.

मुंबई : मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील दुसºया टप्प्याचा निकाल गुरुवारी तब्बल २४ वर्षांनी लागला. आरोपी फिरोज खान व ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या या दोघांना विशेष टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तर पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेम व करीमुल्ला खान या दोघांना जन्मठेपेची तर रियाज अहमद सिद्दिकीला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.अबू सालेमसह, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, फिरोज रशीद खान, करीमुल्ला खान यांना बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी टाडा तसेच भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल व शस्त्रास्त्रे कायद्यांतर्गत न्यायाधीश जी.ए. सानप यांनी शिक्षा ठोठावली. तर रियाझ सिद्दिकीला टाडाअंतर्गत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कय्युमवरील आरोप सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत. त्याची एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.सर्व आरोपींना मिळून २६ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या स्फोटांत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना नुकसान भरपाई म्हणून ही दंडाची रक्कम देण्यात येणार आहे.मुख्य आरोपी, त्यांची स्फोटातील भूमिका-ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या : दाऊद आणि टायगर मेमनचा खास समजल्या जाणाºया ताहीरने बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचा बदला घेण्याचे दाऊद व मेमनच्या मनावर बिंबवले. बॉम्बस्फोटासंदर्भात दुबईत घेण्यात आलेल्या बैठकीत ताहीर उपस्थित होता. भारतात बेकायदा शस्त्रास्त्रांचा कारखाना सुरू करण्यासाठी त्याने पैशांची जमवाजमव केली होती.फिरोज अब्दुल रशीद खान : मुस्तफा डोसा व त्याचा भाऊ मोहम्मद डोसाचा अतिशय जवळचा. आरडीएक्स, शस्त्रे व स्फोटके दिघी व शेखाडी बंदरावर उतरवण्यापूर्वी मुस्तफाने फिरोजला दुबईहून भारतात पाठवून तेथील कस्टम व पोलीस अधिकाºयांना सामान उतरवण्याची वार व वेळ कळवली. अधिकाºयांना त्यासाठी लाचही दिली. दुबईत झालेल्या बैठकीतही उपस्थित होता.करीमुल्ला शेख : करीमुल्ला शेखने त्याच्या मित्राला शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये पाठविले. त्यानंतर त्याला मुंबईत शस्त्रे आणि आरडीएक्स आणण्यासाठी मदत केली. मुख्य सूत्रधार व फरारी आरोपी टायगर मेमनबरोबर खानने काम केले आहे.मुस्तफा डोसा : बॉम्बस्फोटांसाठी चार पथके होती. त्यातील एकाचा मुस्तफा डोसा प्रमुख होता. शस्त्रे, आरडीएक्स, एके-५६, हँड ग्रेनेड, डिटोनेटर्स इत्यादींचे स्मगलिंग केले. डोसाने टायगर मेमन व छोटा शकीलच्या मदतीने पाकिस्तान व भारतात तरुणांना शस्त्र चालविण्याचे व स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. पनवेल व दुबईत झालेल्या बैठकांना तो उपस्थित होता.अबू सालेम :जानेवारी १९९३मध्ये अबू सालेम एका फरार आरोपीसह गुजरातमध्ये भरूचला गेला. तेथून त्याने शस्त्रे, १०० हँड ग्रेनेड आणि काही बंदुकीच्या गोळ्या घेतल्या. मारुती व्हॅनमधून हे सर्व सामान मुंबईत आणण्यात आले. त्यातील काही शस्त्रे आणि स्फोटके त्याने अभिनेता संजय दत्तच्या घरी ठेवली व दोन दिवसांनी परत घेतली.रियाझ सिद्दिकी भरूचवरून मुंबईत सर्व शस्त्रे, स्फोटके पाठवण्यासाठी सालेमला पांढºया मारुती व्हॅनची व्यवस्था करून दिली.

टॅग्स :MumbaiमुंबईCourtन्यायालय