शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील 19 वर्षीय हिंदू तरुण घेतोय जैन धर्माची दीक्षा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 18:27 IST

डोंबिवली शहराच्या पूर्व भागातील तुकारामनगरात राहणारा 19 वर्षीय तरुण जैन धर्माची दीक्षा घेणार आहे,.

डोंबिवली - शहराच्या पूर्व भागातील तुकारामनगरात राहणारा मंदार म्हात्रे हा तरुण हिंदू धर्माच्या चालीरीतीमध्ये वाढलेला. त्याच्या शेजारी राहणा-या मधुबेन यांच्या सान्निध्यात आला. त्याच्यासोबत तो जैन मंदिरात जाऊ लागला. त्याला जैन धर्म आवडू लागला. आत्ता त्याने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले विधी त्याने पार पाडले आहेत. येत्या 27 एप्रिल रोजी तो विधीवत जैन धर्माची दीक्षा घेत आहे. त्याच्या दीक्षा समारंभास त्याच्या आई वडिलांची मान्यता आहे.     ‘भारतात धर्माचे स्वातंत्र आहे हे ते जगाच्या पाठीवर अन्य कुठेही नाही, असे वक्तव्य काही वर्षापूर्वी दिवंगत पोप जॉन पॉल सेकंड यांनी भारत भेटीच्या दरम्यान केलेले केले होते. त्याची प्रचिती पुन्हा एकदा म्हात्रे याच्या दीक्षा समारंभाच्या निमित्ताने येत आहे. लहान पणीचा परिपोष हे मानवी जीवन घडविण्याचे आणि संस्काराचे काम करते. मंदार हा तुकारामनगरात राहत असताना त्याच्या शेजारी मधूबेन नागाडा राहत होत्या. त्या मंदारला मुलाला सारख्या मानत होत्या. मंदारही त्याचा जणूकाही मानसपूत्रच झाला होता. त्याच्या घरी येणो जाणो होते.

जैन मंदिरात जाताना मधूबेन मंदारला प्रार्थनेकरीता नेऊ लागल्या. त्याच्यावर जास्तीत जास्त जैन धर्माच्या प्रार्थनेचा प्रभाव झाला. या संस्काराचा पश्चात मंदारने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला त्यावेळी त्याचे वडील सुभाष म्हात्रे यांनी दीक्षा घेणो काही सोपे काम नाही. कठीण असते. त्यावर मंदार याने त्याची पूर्ण मानसिक तयारी झाली असल्याचे ठामपणो वडिलांना सांगितले. दीक्षा घेण्याआधी उद्यापन करावे लागते. त्याकरिता मंदार याने 3 हजार किलो मीटरचा प्रवास पायी केला आहे. त्या परिक्षेत तो खरा उतरला आहे. त्यानंतर त्याला दीक्षा देण्याचा दिवस ठरला आहे. 27 एप्रिल रोजी मंदार हा जैन धर्माची दीक्षा घेत आहे. मंदार हा सोमवंशी क्षत्रिय पठारे समाजाचा होता.  आत्ता तो जैन होणार आहे. त्याच्या वडिलांनी सांगितले की, मंदारने त्याच्या मनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध नाही. आम्ही सगळे त्याच्या दीक्षा समारंभास उपस्थित राहणार आहोत. त्याच्या आनंदात आम्हाला आनंद आहे. तो एक चांगले काम करीत आहे. त्याला जो धर्म आवडतो. त्याचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीHinduहिंदूAdhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या