शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

१९ विमानं, ४ हेलिकॉप्टरच्या गिरक्यांनी सोलापूरकरांचे डोळे आकाशाकडे

By admin | Updated: September 4, 2016 22:32 IST

विमानाच्या गिरक्यांनी रविवारी सोलापूरकरांचे डोळे आकाशाकडे लागले.

राजकुमार सारोळेसोलापूर, दि. 4 - विमानाच्या गिरक्यांनी रविवारी सोलापूरकरांचे डोळे आकाशाकडे लागले. सोलापूर विमानतळावर दिवसभरात १९ विमाने व ४ हेलिकॉप्टर उतरली. होटगीरोड विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक झाली.विमान वाहतुकीची या गर्दीचे निमित्त होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी,राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय अर्थमंत्री व खासदार पी. चिदंबरम, माजी केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शैलजा, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी खासदार विजय दर्डा, मोहन बाबू आदींसह अनेक मान्वरांचे विमान व हेलिकॉप्टरने सोलापुरात आगमन झाले. श्सकाळी साडेआठ वाजता माजी मंत्री पतंगराव कदम यांचे विमान आले. त्यानंतर साडेदहा वाजता मुख्यमंत्री फडवणीस व इतर मान्यवरांची विमाने आली. विमानतळावर पार्किंगसाठी जागा नसल्याने ही विमाने तातडीने लातूर, हैदराबाद, पुणे, मुंबईकडे रवाना झाली. शनिवारी मुंबईत खराब हवामानामुळे एक हेलिकॉप्टर सोलापूर विमानतळावरच उतरविण्यात आले होते. हे हेलिकॉप्टर रविवारी सकाळी रवाना झाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आगमनासाठी दुपारी अडीच वाजता विमानतळ राखीव ठेवण्यात आले. पावणेतीन वाजता बीदरहून राष्ट्रपतींच्या तीन हेलीकॉप्टरचा ताफा विमानतळावर आला. कार्यक्रम आटोपून राष्ट्रपतींचा ताफा बीदरकडे रवाना होईपर्यंत विमानतळावर कडक सुरक्षा होती. राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर बीदरकडे झेपावल्यावर पुन्हा विमानांचा राबता सुरू झाला. शेवटचे विमान सायंकाळी साडेसहा वाजता टेकआॅफ झाले. दिवसाभरात राष्ट्रपतींच्या ताफ्यातील तीन हेलिकॉप्टर, एक खाजगी हेलिकॉप्टर आणि विमानांचे टेकआॅफ व लँडिंग ३८ झाले अशी माहिती विमानतळाचे नियंत्रक गायकवाड यांनी दिली. सोलापूर विमानतळावरची आजची वाहतूक ऐतिहासिक ठरली. विमानतळाशेजारी राहणाऱ्या नागरिकांना पुणे—मुंबई विमानतळाच्या परिसराच्या वातावरणाचा अनुभव आला.विमानतळ गजबजलेमाजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी अनेक व्हीव्हीआयपी विमानाने आले. त्यामुळे मान्यवरांच्या स्वागतासाठी विमानतळावर सर्वच पक्षीय कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. पाहुण्यांना सोडून विमाने पुन्हा आकाशात झेपावत होती. शहरातील मुलांना मात्र विमानांची ही गंमत वाटत होती.