शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विसर्जनात १८ गणेशभक्तांचा मृत्यू

By admin | Updated: September 29, 2015 02:56 IST

राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी अंत झाला. त्यात मराठवाड्यात ६, नाशिक व नगरमध्ये प्रत्येकी ३, पुणे व गडचिरोलीतील

मुंबई : राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी अंत झाला. त्यात मराठवाड्यात ६, नाशिक व नगरमध्ये प्रत्येकी ३, पुणे व गडचिरोलीतील प्रत्येकी एक व साताऱ्यात दोन अशा १६ गणेशभक्तांचा बुडून मृत्यू झाला. तर खान्देशात मिरवणुकीत नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने दोघांना जीव गमवावा लागला. प्रतिक हौसेराव गायकवाड (१३) व सुजित भास्कर गाढवे (१४ दोघे रा़ कुसूमनगर, जि. उस्मानाबाद), आशिष बजरंग कोल्हापूरे, ज्योतिबा सखा कोल्हापूरे (१२, दोघे रा. शेपवाडी, जि. बीड) आणि विद्याधर मेघवाल (२५, रा. जालना), अनिल भगवान पाटील (१८, रा. ढवळेश्वर, जालना) यांना विसर्जनादरम्यान जीव गमावावा लागला. गडचिरोलीतील कुरखेडा येथे कामेश चंद्रभान चव्हाण (१७), नाशिकमध्ये संजय नारायण तारु (१६), कृष्णा भिकारीलाल दुर्वे (२३), मयूर संपत वाघ (१६), नगरमध्ये श्रावण भानुदास शिंदे (५७, रा. टाकळी लोणार), प्रशांत श्रीमंत कोकाटे (२२, संगमनेर), पोपट लक्ष्मण गोलवड (५०, रा. शिरसगाव) तसेच सातारा जिल्ह्यात सैदापूर-कऱ्हाड येथे रोहित केंगार (२१) व वर्धनगड येथे अजय विजय पोपळघट (२३, रा. किल्ले धारूर, जि. बीड) यांचा विसर्जनादरम्यान जलाशयात बुडून मृत्यू झाला.रविवारी सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाटप करण्यात आलेल्या सरबतातून ३८ जणांना विषबाधा झाल्याची घटना जोगेश्वरी पूर्वच्या इंदिरा नगरमध्ये घडली. विषबाधा झालेल्या रुग्णांना रात्री साडेदहापासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. २० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी जोगेश्वरीच्या साई माऊली वारकरी सेवा समितीतर्फे मेघवाडीतील इंदिरानगर परिसरात सरबत वाटप करण्यात येत होते. ओमकार साई सेवा समितीतील कार्यकर्त्यांनी येथील सरबत प्यायले. थोड्याच वेळात त्यांना उलट्या होऊ लागल्या. एकूण ३८ जणांना विषबाधेचा त्रास झाला. १८ जणांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले, तर २० जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये ७ मुले, ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश असल्याची माहिती ट्रॉमा केअरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वाडेकर यांनी दिली. या घटनेतील सरबताचे नमुने तपासणीसाठी कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यावरच कोणत्या घटकामुळे विषबाधा झाली, हे स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सरबतातून विषबाधा झाल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशा सूचना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी दिले आहेत. वायकर यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची सकाळी भेट घेतली. (लोकमत न्यूज नेटवर्क)-----------साताऱ्यात डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक !सातारा : लोकहिताबरोबरच लोकभावनेलाही जपण्याचा ‘लोकमत’चा प्रबोधनमार्ग पुन्हा एकदा यशस्वी झाला. ‘डॉल्बीमुक्ती’चा मार्ग मंगलमूर्तींच्या साक्षीने सातारा जिल्ह्यात प्रशस्त झाला आहे. ही लोकचळवळ गावागावात, घरोघरी पोहोचण्यासाठी सर्वांचेच सहकार्य ‘लोकमत’ला लाभले. जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक गावांपैकी केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या गावांतच डॉल्बी वाजली; तीही एकाच स्पीकरचा वापर करून!गेल्या वर्षी डॉल्बीच्या दणदणाटामुळे भिंत कोसळून साताऱ्यात तीन जणांना प्राण गमवावे लागले होते. कर्णकर्कश डॉल्बीमुळे होणारे दुष्परिणाम निदर्शनास आणून देतानाच पारंपरिक मिरवणुकीचा थाट अधोरेखित करुन ‘लोकमत’ने यावर्षी वाचकांना साद घातली. भुर्इंज गावाने डॉल्बीमुक्तीचा श्रीगणेशा ठरावाद्वारे केला आणि सर्व गावे खडबडून जागी झाली. ‘आपल्याही गावात असा क्रांतिकारी निर्णय घ्यायचा,’ असे ठरवून बैठका झाल्या.पोलीस प्रशासनानेही ‘लोकमत’च्या चळवळीला सक्रिय पाठबळ देत गावागावात बैठका घेऊन आवाहन केले होते. (प्रतिनिधी)