शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी १८ कोटी

By admin | Updated: April 7, 2017 01:47 IST

वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते त्यांच्यावर मोफत वैद्यकीय उपचार महापालिकेच्या रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये करण्यात येतात.

मुंबई : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टिकोनातून पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम’ याअंतर्गत वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते त्यांच्यावर मोफत वैद्यकीय उपचार महापालिकेच्या रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये करण्यात येतात. महापालिकेने याअंतर्गत शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमासाठी सुमारे १८ कोटी ६६ लाख रुपयांची तरतूद केली आहे.महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणी विभागांतर्गत असणाऱ्या ‘वैद्यकीय अधिकाऱ्यां’ना कार्यवाहीसाठी साधारणपणे १३ कोटी ४३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्रपणे कार्यरत असणाऱ्या ८ चिकित्सालयांसाठी सुमारे ५ कोटी लाख २३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण १८ कोटी ६६ लाखांपेक्षा अधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमधून साधारणपणे १ लाख ९० हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २६ हजार ५०७ विद्यार्थ्यांना उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये पाठवण्यात आले होते. (प्रतिनिधी)वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमूमहापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत वैद्यकीय तपासणी विभागात ‘वैद्यकीय अधिकारी (शाळा)’ यांची चमू कार्यरत असते.हेल्थ कार्डावर नोंदली जाते माहिती२४ डॉक्टरांचे पथकवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूद्वारे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. तपासणीच्या नोंदी ठेवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वतंत्र ‘हेल्थ कार्ड’ देण्यात येते. हेल्थ कार्डमध्ये विद्यार्थ्याची जन्म तारीख, उंची, वजन यासह वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक ती सर्व माहिती वेळोवेळी नोंदविली जाते. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूमध्ये २४ डॉक्टरांसह नर्स व साहाय्यक कार्यरत आहेत.क्लिनिक कार्ड किंवा डिस्पेन्सरी कार्ड विद्यार्थ्यांना यासाठी ‘वैद्यकीय अधिकाऱ्या’मार्फत स्वतंत्र ‘क्लिनिक कार्ड’ किंवा ‘डिस्पेन्सरी कार्ड’ देण्यात येते. या कार्डच्या आधारे संबंधित विद्यार्थ्यावर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये किंवा दवाखान्यांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येतात.>शालेय आरोग्य तपासणी शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत जून २०१६ ते ३१ मार्च २०१७ दरम्यान महापालिकेच्या शाळेतील सुमारे १ लाख ९० हजार विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.यामध्ये प्राथमिक शाळांमधील सुमारे १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांचा तर माध्यमिक शाळांतील सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता.४६४ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यापैकी २६ हजार ५०७ विद्यार्थ्यांना मोफत उपचारांसाठी पाठवण्यात आले. तर २८० विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले.पाच विद्यार्थ्यांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या तपासण्यांदरम्यान जन्मजात हृदयरोग असणाऱ्या ५ विद्यार्थ्यांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया गेल्या वर्षी करण्यात आल्या. नेत्रदोष आढळून आलेल्या ७२४ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्यात आले.आठ ठिकाणी स्वतंत्र चिकित्सालय महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सध्या ८ ठिकाणी स्वतंत्र चिकित्सालये (क्लिनिक) आहेत. हे क्लिनिक केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर. एन. कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय, बोरीवली येथील भगवती रुग्णालय, नायर दंत महाविद्यालय व लायन्स जुहू दंत चिकित्सालय अशा ८ ठिकाणी कार्यरत आहेत. तसेच महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील १७५ दवाखान्यांमध्ये विद्यार्थ्यांवर मोफत उपचार केले जातात.