शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१,७६७ कोटींचा भूखंड घोटाळा, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 06:12 IST

बांधकाम व्यावसायिक मनिष भतीजा आणि संजय भालेराव यांना अवघ्या साडेतीन कोटी रुपयांत विकण्यात आली असून हा व्यवहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खाते, सिडको आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या संगनमताने झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या २४ एकर जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली १७६७ कोटी रुपयांची जमीन बांधकाम व्यावसायिक मनिष भतीजा आणि संजय भालेराव यांना अवघ्या साडेतीन कोटी रुपयांत विकण्यात आली असून हा व्यवहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खाते, सिडको आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या संगनमताने झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश केला केला. नवी मुंबईतील सिडकोच्या मालकीची रांजणपाडा, खारघर या मोक्याच्या ठिकाणची २४ एकर जमीन (सध्याची किंमत: १७६७ कोटी) कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली होती. मात्र या जमिनीचे संजय भालेराव यांच्या नावे मुख्त्यारपत्र तयार करून ती जमीन पॅरडाईज बिल्डरच्या मनीष भतीजा यांना अवघ्या ३ कोटी ६० लाख रुपयांना विकण्यात आली. हा सगळा व्यवहार १४ मे २०१८ या एकाच दिवशी पार पडला. हा भूखंड घोटाळा मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास खात्याशी संबंधित असल्याने याची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्र्तींमार्फत करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.भाजपाचे आमदार प्रसाद लाड आणि बांधकाम व्यावसायिक मनीष भतिजा यांचे व्यवहारिक संबंध असून त्यातूनच हा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले प्रश्नसिडकोची सेंट्रल पार्कसाठी राखीव ठेवलेली जमीन रायगडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकारात कोयना प्रकल्पग्रस्तांना दिली?कोयना प्रकल्पात हजारो शेतकरी विस्थापित झालेले असताना आठच शेतकरी कोणत्या निकषांवर निवडले गेले?प्रकल्पग्रस्तांना शेतजमीन देण्याचा नियम असताना त्यांना शहरातील मोक्याची जमीन कशी देण्यात आली?नियमाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना १० वर्षे जमीन विकता येत नसताना हा सगळा व्यवहार १४ मे २०१८ या एकाच दिवशी कसा झाला?पॅरडाईज बिल्डरला सरकारचे हजारो कोटींचे नुकसान करून कवडीमोल भावाने जमीन का दिली?या बिल्डरचे आणि सिडको व नागरी विकास मंत्रालय यांच्यामध्ये कोणते संबंध आहेत का?काँग्रेसच्या मागण्या२४ एकर जमिनीचे हस्तांतरण रद्द कराबेकायदा जमीन हस्तांतरण करणा-यांवर कारवाई करान्यायालयीन चौकशी करा

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस