शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभागातील १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 04:00 IST

बुलडाण्याचे अधीक्षक सुधाकर कदम यांची बदली औरंगाबाद येथे अधीक्षक पदावर करण्यात आली आहे. जळगावचे अधीक्षक सुधीर आढाव हे या वर्षी निवृत्त होणार असल्याने त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत त्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक ते सह आयुक्त दर्जाच्या एकूण १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सह आयुक्त गट ‘अ’ या संवर्गातील विश्वनाथ इंदिसे (मळी व मद्यार्क) यांची बदली सह आयुक्त (प्रशासन), तनुजा दांडेकर (प्रशासन) यांची बदली सह आयुक्त (मळी वमद्यार्क) या पदावर करण्यात आली आहे.

नाशिकचे विभागीय उप आयुक्त प्रसाद सुर्वे यांची बदली पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे. नागपूरचे विभागीय उप आयुक्त यू. आर. वर्मा यांची बदली संचालक (अंमलबजावणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क या पदावर करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्ह्याचे अधीक्षक अनिल चासकर यांची बदली सातारा जिल्हा अधीक्षकपदी करण्यात आली आहे.

तर, बुलडाण्याचे अधीक्षक सुधाकर कदम यांची बदली औरंगाबाद येथे अधीक्षक पदावर करण्यात आली आहे. जळगावचे अधीक्षक सुधीर आढाव हेया वर्षी निवृत्त होणार असल्याने त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत त्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय १० निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगरमधील ‘पी’ विभागातील जी. आर. राजूरकर यांची बदली ‘ई’ विभागात, ‘यू’ विभागातील बी. के. जाधव यांची बदली ‘डब्ल्यू’ विभागात, ‘डब्ल्यू’ विभागातील आर. बी. बिराजदार यांची ‘एन’ विभागात, ‘एन’ विभागातील एन. एन. नागरगोजे यांची बदली ‘यू’ विभागात तसेच ए. डी. देशमुख यांची ठाणे येथील ‘सी’ विभागातून मुंबई शहरमधील ‘आय’ विभागात बदली करण्यात आली आहे.

पुण्यातील हडपसर येथील व्ही. ओ. मनाले यांची बदली दौंड विभागात, खोपोली येथील बालाजी माने यांची बदली हडपसर येथे, खामगाव येथील किरणसिंह पाटील यांची बदली चाळीसगाव येथे, इचलकरंजी येथील एल. एम. शिंदे यांची बदली सातारा येथे व औरंगाबाद येथील के. एम. जाधव हे सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांना त्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.