शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

१७ अभियंते निलंबित

By admin | Updated: February 19, 2015 02:57 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबईचे १३ आणि नाशिकमधील ४ अभियंत्यांना निलंबित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठा दणका दिला.

बांधकाम खात्याला मुख्यमंत्र्यांचा दणका यदु जोशी - मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबईचे १३ आणि नाशिकमधील ४ अभियंत्यांना निलंबित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठा दणका दिला. मुंबईच्या अभियंत्यांनी बेजबाबदारपणे मोजमाप पुस्तिका वांद्रे येथील विभागाच्या विश्रामगृहात ठेवल्या होत्या. तर दुसरीकडे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या निवृत्तीची रंगिली पार्टी नाशिकच्या चार अभियंत्यांना भोवली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामाशी संबंधित मोजमाप पुस्तिका (एमबी) वांद्रे येथील विश्रामगृहाच्या स्टोअर ्नरूममध्ये असल्याची माहिती या प्रकरणी चौकशी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) मिळाली होती. त्यानुसार छापे टाकले असता २४५ एमबी आढळल्या होत्या. सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र सदन, मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरुस्ती, निवडणूक कामे आदी कामांच्या एमबी होत्या. या एमबी शाखा अभियंते तयार करून उपअभियंत्यांकडे पाठवितात. उपअभियंते त्यांची तपासणी करून ते कार्यकारी अभियंत्यांकडे बिलांसाठी पाठवितात. त्याच्या आधारे कंत्राटदारांना बिले अदा केली जातात. बिले अदा केल्यानंतर कार्यकारी अभियंता ते उपअभियंता या मार्गे त्या शाखा अभियंत्यांना परत केल्या जातात. या एमबी योग्य जबाबदारीने जतन करण्याची जबाबदारी शाखा अभियंत्यांची असताना त्या विश्रामगृहात एकत्रित ठेवण्यामागील हेतू संशयास्पद होता, असा ठपका या १३ शाखा अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे. इतरांवर दाखविली दयाजवळपास ३७ शाखा अभियंत्यांच्या एमबी छाप्यामध्ये सापडल्या होत्या. त्यामुळे या ३७ जणांना निलंबित केले जाईल, असे म्हटले जात होते. तथापि, प्रत्यक्षात ज्या शाखा अभियंत्यांच्या पाच किंवा त्यापेक्षा जास्त एमबी आढळल्या, त्यांना निलंबित करण्यात आले आणि इतरांवर दया दाखविण्यात आली. मुंबईतील निलंबित शाखा अभियंते१) एस.डब्लू.चव्हाण, २) व्ही. जी. देशपांडे, ३) डी. ए. पाटील, ४) जी. एम. गावकर,५) व्ही. एच. अहिरे, ६) एस. बी. सोनानीस, ७) जी. पी. डोंबाळे, ८) आर. बी. परदेशी, ९) आर. एच. जगदाळे, १०) ए. ई.पनाड, ११) व्ही.पी.पाटील, १२) एम.बी.घरत, १३) ए.एम.जाधव.नाशिकमधील निलंबित अभियंतेउपविभागीय अभियंता : त्र्यंबकेश्वर-डी. टी. भदाणे, शाखा अभियंता : त्र्यंबकेश्वर-गडाख, साहाय्यक अभियंता; चांदवड - राहुल पाटील आणि शाखा अभियंता; चांदवड एम. यू. मोरे.च्नाशिकमध्ये मुख्य अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या निवृत्तीनिमित्त ३१ जानेवारीला ओझर विमानतळाच्या लॉनवर पार्टी रंगली होती. च्बांधकाम खात्याचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांनी उपसचिव डेकाटे यांना चौकशीचे आदेश दिले होते. हा चौकशी अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ४ अभियंत्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या पार्टीमध्ये बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष विलास बिरारी, उपाध्यक्ष गोपाल अटल, सचिव रामेश्वर मालानी हेही सामील झाले होते, असे चौकशीत आढळले आहे.