शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१६५ खलाशी पाकमध्ये भोगताहेत नरकयातना, मच्छीमारांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 09:36 IST

Palghar: पाकिस्तानी कारागृहात मागील चार वर्षांपासून शिक्षा पूर्ण झालेले १४ भारतीय खलाशी, तर तीन वर्षांपासून १५१ खलाशी असे एकूण १६५ खलाशी आजही नरकयातना भोगत आहेत. मायभूमीत परतण्यासाठी ते व्याकूळ झाले आहेत.

पालघर : ओखा, पोरबंदर येथील बंदरातून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी मच्छीमारांना पाकिस्तानी सैन्याने तुरुंगात डांबले आहे. अनेक मच्छीमारांनी तुरुंगातील शिक्षा भोगूनही त्यांची सुटका केली जात नाही. पाकिस्तानी कारागृहात मागील चार वर्षांपासून शिक्षा पूर्ण झालेले १४ भारतीय खलाशी, तर तीन वर्षांपासून १५१ खलाशी असे एकूण १६५ खलाशी आजही नरकयातना भोगत आहेत. मायभूमीत परतण्यासाठी ते व्याकूळ झाले आहेत.

मच्छीमारांनी तुरुंगातील शिक्षा भोगूनही त्यांची सुटका केली जात नसल्याने  त्यांच्या सुटकेचे प्रयत्न करावेत, यासाठी आमदार सुनील भुसारा यांनी पालघरमध्ये आलेल्या केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक आणि कपिल पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. पाकिस्तानी कारागृहात मागील पाच वर्षांपासून शिक्षा पूर्ण झालेले ६५४ भारतीय मच्छीमार असून, त्यातील ६३१ मच्छीमारांची शिक्षा पूर्ण झाली आहे. दरम्यान, भारताच्या तुरुंगात असलेल्या एकूण ९५ पाकिस्तानी कैद्यांपैकी १२ कैद्यांची सुटका केल्याची माहिती इंडिया पाकिस्तान पीपल्स फोरम फोर पीस अँड डेमॉक्रॅसी या संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली.

जिल्ह्यातील मच्छीमारांच्या सुटकेसाठी विक्रमगडचे आमदार भुसारा यांनी अलीकडेच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवरून  प्रयत्न करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. शनिवारी पालघर येथे एका कार्यक्रमात आलेल्या केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक आणि पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली.

जास्त पगारामुळे जातात गुजरातमध्येn पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यांतील शेकडो मच्छीमार व आदिवासी खलाशी कामगार पालघरच्या किनारपट्टीवरील बोट मालकाकडून मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त पगार मिळत असल्याने गुजरात राज्यातील पोरबंदर, ओखा येथील बोटमालकांकडे कामासाठी जातात.n समुद्रात मासेमारीला जाताना प्रवाहाचा वेग आणि माशांच्या कळपाचा मागोवा घेत अनेक मच्छीमारांवर पाकिस्तानी क्षेत्रात प्रवेश केल्याचा ठपका ठेवला जातो. पाकिस्तानी सैनिकांकडून अटक केली जाते. त्यांना अटक केल्यानंतर त्यांची तुरुंगातील शिक्षा पूर्ण केल्यानंतरही त्यांची सुटका करण्यात केंद्रातील सरकारला अपयश येते. n आज शेकडो मच्छीमार पाकिस्तानी कैदेत खितपत पडून असल्याने त्यांचे कुटुंबीय संकटात सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबाची होणारी दैनावस्था आमदार भुसारा यांच्यासमोर त्या कुटुंबातील सदस्यांनी मांडल्यानंतर त्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष देऊन हा मुद्दा उचलून धरला आहे.

टॅग्स :palgharपालघरfishermanमच्छीमार