शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 16 हजार उमेदवार अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षेत; नोकरीचे वयही गेले निघून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 09:52 IST

१३ वर्षांपासून भरती थंडावली , स्थानिक संस्थांतील प्रतीक्षा यादी पोहोचली ५० हजारांवर

- विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनुकंपा उमेदवारांच्या नियुक्तीचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने प्रतीक्षा यादी वाढत चालली आहे. राज्य शासनाच्या कार्यालयातील १६ हजारांहून अधिक उमेदवारांना या योजनेंतर्गत नियुक्तीची प्रतीक्षा आहे. अनेक उमेदवारांचे तर नोकरीचे वयही निघून गेले आहे. जिल्हा परिषद, पालिका व इतर विभागांची अनुकंपा उमेदवार प्रतीक्षा यादी तब्बल ५० हजारांवर असल्याचे सांगण्यात येते. 

शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते. वर्ग तीन आणि चार श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना याचा लाभ मिळतो. मात्र, मागील १३ वर्षांपासून अनुकंपा नियुक्तीचे घोडे लंगडे झाले आहे. थेट नियुक्ती आदेशाची पद्धत बंद होऊन प्रतीक्षा यादी सुरू झाली.राज्य शासकीय कार्यालयात पदभरती निघाल्यास त्यातील दोन टक्के पदे अनुकंपा प्रतीक्षा यादीतून भरली जात होती. अर्थात, ५० टक्के जागा असल्यास त्यात अनुकंपाची केवळ एक जागा ठेवली जात होती. पुढे पाच, नंतर दहा आणि आता २० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. अनुकंपा उमेदवाराला नोकरीसाठीची वयोमर्यादा ४५ आहे. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने कुटुंबाची वाताहत होते. सरकारी घर त्यांना तीन महिन्यात सोडावे लागते. कुटुंब निवृत्ती वेतनात शिक्षण, घरखर्च भागत नाही. कार्यप्रसंग, आरोग्याचा प्रश्न सोडविताना आर्थिक समस्या उभ्या ठाकतात. आता तर २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनही मिळत नाही. त्यामुळे अनुकंपा नियुक्त्या तातडीने मिळाव्यात, अशी अपेक्षा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना आहे. 

    २० टक्केची मुदत डिसेंबरपर्यंतn पदभरतीत २० टक्के जागा अनुकंपा उमेदवारांमधूनच घ्याव्यात, या सवलतीची मुदतही ३१ डिसेंबर २०२१ला संपणार आहे. n याला मुदतवाढ दिली जाते की, मर्यादा दहा टक्क्यांवर आणली जाते, याकडे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे लक्ष लागले आहे. n राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये अडीच लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. असे असतानाही अनुकंपा उमेदवारांना ताटकळत का ठेवले जाते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खास बाब म्हणून नियुक्त्या कराव्याअनुकंपाच्या सर्व १०० टक्के उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी. २० ते २५ वर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने शासनाकडे लावून धरला आहे.      - अविनाश दौंड,     कार्यालय सचिव, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरी