शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

पनवेलच्या रणांगणात १६० कोट्यधीश उमेदवार

By admin | Updated: May 15, 2017 00:49 IST

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल १६० उमेदवार कोट्यधीश असल्याचे निदर्शनास आले आहे. भाजपाचे परेश रामशेठ ठाकूर यांच्याकडे सर्वाधिक ९५ कोटी ४७ लाख रूपयांची मालमत्ता आहे.

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल १६० उमेदवार कोट्यधीश असल्याचे निदर्शनास आले आहे. भाजपाचे परेश रामशेठ ठाकूर यांच्याकडे सर्वाधिक ९५ कोटी ४७ लाख रूपयांची मालमत्ता आहे. निवडणूक लढणाऱ्या तब्बल ९९ टक्के उमेदवारांकडे लाखो रूपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले आहे. नगरपालिकेची निवडणूक लढणाऱ्या अनेकांकडे आमदार व खासदारांपेक्षाही जास्त मालमत्ता आहे. देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पनवेलची देश-विदेशात ओळख निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे, नैना, जवळच असलेल्या जेएनपीटीमुळे पुढील पाच वर्षामध्ये ६० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या परिसरामध्ये होणार आहे. यामुळे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीकडे राजकीय व उद्योग क्षेत्राचेही लक्ष लागले आहे. भविष्यातील श्रीमंत पालिका आपल्या ताब्यात असावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास सुरवात केली आहे. भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेने उद्धव ठाकरे, शेकाप, राष्ट्रवादी, काँगे्रस आघाडीने शरद पवार यांच्यापासून पक्षाच्या प्रमुख नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरविले आहे. पण याबरोबरच सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना इच्छुकांच्या सामाजिक योगदानाबरोबर आर्थिक स्थितीलाही प्राधान्य दिले आहे. निवडणुकीमध्ये कोण किती पैसे खर्च करू शकतो याची विचारणा अनेकांनी उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये इच्छुकांना केली होती. प्रत्यक्ष उमेदवारी वाटपामध्येही श्रीमंतांना मानाचे स्थान दिल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांपैकी तब्बल १६० उमेदवारांकडे १ कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय तब्बल ९९ टक्के उमेदवारांकडे लाखो रूपयांची संपत्ती आहे. शेतजमिनीपासून व्यावसायिक भूखंड, गाळे असणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते रामशेठ ठाकूर यांचा मुलगा व आमदार प्रशांत ठाकूर यांचा भाऊ परेश ठाकूर यांनी ९५ कोटी ४७ लाख रूपयांची मालमत्ता जाहीर केली असून सर्वात श्रीमंत उमेदवार तेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यानंतर बांधकाम व्यावसायिक असलेले किशोर काशिनाथ म्हात्रे यांनी ३७ कोटी १ लाख रूपयांची, रामदास शेवाळे यांनी २९ कोटी ७९ लाख रूपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. राज्यातील प्रमुख ठेकेदार अशी ओळख असलेले माजी नगराध्यक्ष व शेकापचे नेते जे. एम. म्हात्रे यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांच्याकडेही २६ कोटी ७१ लाख रूपयांची मालमत्ता आहे. पनवेलच्या निवडणुकीमध्ये तब्बल श्रीमंत उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. यापैकी काहीजण अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. काही चेहरे फक्त पैशाच्या बळावर निवडणुकीच्या रणांगणात आहेत.ठाकुरांची श्रीमंती९५ कोटी ४७ लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता घोषित केलेले परेश ठाकूर हे पनवेलमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्या बँक व इतर वित्तीय संस्थांमध्ये ६ कोटी ६० लाख व पत्नीच्या नावावर ४८ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. विविध कंपन्यांमध्ये बंधपत्रे व रोखे स्वरूपात ३ कोटी २४ लाख, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, पोस्टाच्या बचती व एलआयसीमध्ये ७ कोटी ९४ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. परेश यांच्याकडे २ लाख ८६ हजार व पत्नीकडे १७ लाख २० हजार रुपयांचे दागिने आहेत. पनवेल तालुक्यातील पाडेघर येथे त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात शेत जमीन आहे. याच परिसरामध्ये दोन अकृषिक भूखंड आहेत. याशिवाय त्यांच्या मालकीच्या तब्बल ४ व्यापारी इमारती आहेत. त्यांच्या नावावर पाच सदनिका व इतर एकूण ४३ कोटी ४८ लाखांची मालमत्ता आहे. पत्नीच्या नावावर वहाळ येथे शेतजमीन व पुष्पक नोडमध्ये अकृषिक भूखंड अशी १८ कोटी ८६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. २०० नाही ९ कोटींची मालमत्ता निवडणुकीमध्ये खारघरच्या लीना गरड यांच्या मालमत्तेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांनी २०० कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. परंतु महापालिका निवडणुकीत दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी तेव्हा ३७ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी ९ कोटी ८१ लाख रुपयांचीच मालमत्ता जाहीर केली.म्हात्रेंकडे स्थावर मालमत्ता जास्तजे. एम. म्हात्रे यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांच्याकडे २६ कोटी ७१ लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची बँक व इतर वित्तीय संस्थांमध्ये २९ लाख रुपये, कंपन्यांमध्ये बंधपत्रांमध्ये २ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक आहे. उरणमधील विंधणे येथे त्यांच्या शेतजमिनीची किंमत १६ कोटी ७८ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.