शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान सन्मान निधीचे १,५५४ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 07:47 IST

पीएम किसान सन्मान निधी; चार वर्षांत ९२.७४ कोटी परत मिळविण्यात यश

मुंबई - पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी सहा हजार रुपये जमा होतात. मात्र एप्रिल २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत सुमारे ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम थोडीथोडकी नसून १५५४ कोटी रुपये इतकी आहे. त्यातील केवळ ९२.७४  कोटी रुपये पुन्हा वसूल करण्यात सरकारच्या कृषी विभागाला यश आले आहे. 

किसान सन्मान निधीअंतर्गत राज्यातील सुमारे १ कोटी १० लाख ५९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या योजनेच्या निकषानुसार आयकर भरणारी व्यक्ती, आमदार, खासदार, वकील डॉक्टर आदी या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. मात्र अशा अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसै जमा झालेले आहेत.  

आतापर्यंतची वसुली कर भरणाऱ्यांकडून ७७ लाख रुपये तर अन्य अपात्र शेतकऱ्यांकडून १५.६७ लाख रुपयांची वसुली आतापर्यंत करण्यात आली आहे. 

७/१२ वर करणार थकबाकीची नोंद नोटिसा पाठवूनही या शेतकऱ्यांकडून दाद दिली जात नसल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीच्या ७/१२ वरच पैशांच्या थकबाकीची नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे बँकांकडून कर्ज घेताना तसेच जमिनीचे कोणतेही व्यवहार करताना या शेतकऱ्यांना पैसे जमा करूनच पुढचे व्यवहार करता येणार आहेत.

खात्यात पैसेच नाहीतसरकारने यासाठी संबंधित अपात्र शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी नोटिसा पाठवल्या. पैसे जमा झालेल्या खात्यांतून पैसे वळते करण्याचे निर्देश बँकांनाही देण्यात आले. मात्र असे केले असता बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यात शून्य शिल्लक असल्याचे दिसून आले.  

ई केवायसीमुळे घटली संख्या : केंद्र सरकारकडून सन्मान निधीचा १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी सक्ती असल्याने शेतकऱ्यांची संख्या ८० लाखांपर्यंत खाली आली आहे.  

वसुलीचे काम हाती : अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आली आहे. आता खात्यावर गेलेली ही रक्कम पुन्हा वसूल करण्याचे काम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.