शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१५५ शेततळ्यांचे काम पूर्ण, शेतक-यांचा प्रतिसाद वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:49 IST

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने किमान जमीन धारण क्षेत्राची अट शिथिल केल्याने शेतकºयांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात १५५ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७३३ शेतकºयांच्या अर्जांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. तालुकास्तरीय समितीने ...

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने किमान जमीन धारण क्षेत्राची अट शिथिल केल्याने शेतकºयांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात १५५ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७३३ शेतकºयांच्या अर्जांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. तालुकास्तरीय समितीने छाननी करु न एकूण २७५ अर्जांना मंजुरी दिली असून तसे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. मान्यताप्राप्त कामांपैकी ३० जून २०१७ अखेर १५५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यासाठी एकूण ६८ कोटी ४८ लाख रु पयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील निधी संबंधित शेतकरी खातेदारांच्या बँक खात्यावर आर.टी.जी.एस. पद्धतीने जमा करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबविण्यात येत आहे. कोकण विभागातील भौगोलिक परिस्थिती व शेतकºयांची जमीनधारण क्षमता अत्यल्प असल्याने या योजनेंतर्गत ०.६० हेक्टर किमान धारण क्षेत्राची अट शिथिल करु न ती ०.०२ हेक्टर करण्यास २० मे रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना त्याचा लाभ होत आहे.