शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

माळीण दुर्घटनेतील मृतांची संख्या 151

By admin | Updated: August 6, 2014 01:56 IST

माळीण गावावर डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या सातव्या दिवशी ढिगा:याखालून आणखी 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले अ

घोडेगाव : माळीण गावावर डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या सातव्या दिवशी ढिगा:याखालून आणखी 1क् मृतदेह बाहेर काढण्यात आले असून यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 151वर पोहोचली आहे. एकूण 152 लोक ढिगा:याखाली गाडले गेले असल्याचा अंदाज प्रशासनाने काढला आहे.
या दुर्घटनेतून वाचलेले ग्रामस्थ व नातेवाईक यांत्याकडून माहिती घेऊन प्रशासनाने डोंगराच्या ढिगा:याखाली गाडले गेलेल्यांची यादी निश्चित केली आहे. माळीण गावठाण व सात वाडय़ावस्त्या धरून येथील लोकसंख्या 7क्4 होती. या पैकी 182 लोक माळीणमध्ये राहत होते. तर, बाहेरून गावात आलेले 8 जण होते. यातील 38 लोकांना वाचविण्यात आले असून उर्वरित 152पैकी 151 लोकांचे मृतदेह  सापडल्याचे प्रांत अधिकारी डी. बी. कवितके, गटविकास अधिकारी विवेक इलमे व ग्रामस्थांनी एकत्र बसून निश्चित केले आहे. मंगळवारी दुपारी तीननंतर गावाच्या मागच्या बाजूला ढिगा:याखाली गाडली गेलेली असलेल्या झांजरे, लेंभे कुटंबीयांची पाच ते सहा घरे उकरण्यात आली. यामधून सर्वात जास्त 16 मृतदेह आढळले. मृतदेह अतिशय सडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. 
अडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी येथील ग्रामस्थ, नातेवाईक व लहान मुलांचे कौन्सिलिंग करण्याची गरज आहे असे सुचविले होते. त्यानुसार पुणो येथून डॉ. मिलिंद भोई व त्यांची चार डॉक्टरांची टीम माळीणमध्ये आली होती. आसाणो आo्रमशाळेत माळीणचे ग्रामस्थ राहात असून येथे हे मानसोपचारतज्ज्ञ मुले, नातेवाईक यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मनावर आलेला ताण कमी करण्याचे काम करणार आहेत. मात्र ग्रामस्थांच्या मनात मृतां विषयीच्या आठवणी कायम असल्याचे चित्र आहे.
 
जी माती आम्ही हाताने खोदून शेती केली, ज्या मातीची आम्ही पूजा केली, त्या मातीने आम्हाला धोका दिला आहे, माळीणची जमीन शापित झाली आहे, त्यामुळे येथे आम्हाला राहायचे नाही, आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी सुहास झांजरे या युवकाने व्यक्त केली.