शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुबार नोंदणी असलेले साडेदहा लाख मतदार वगळले, आयोगाची कार्यवाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:36 IST

 राज्यात गेल्या वर्षी जानेवारीत ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. मात्र, दुबार, छायाचित्र नसलेले व मृत्युमुखी पडलेल्यांची नावे वगळण्यात आली.

मुंबई : राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० लाख ५६ हजार मतदार कमी झाले आहेत. तर, दिव्यांग मतदारांत १५ हजारांनी वाढ झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने ही कार्यवाही केली. दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे, मृत्युमुखी पडलेले व छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याबाबत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता त्याअंतर्गत १०.५६ लाख मतदार कमी झाल्याची माहिती आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालयात आयोजित पत्र परिषदेत दिली. राज्यात गेल्या वर्षी जानेवारीत ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. मात्र, दुबार, छायाचित्र नसलेले व मृत्युमुखी पडलेल्यांची नावेवगळण्यात आली. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची संख्या ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ इतकी झाली आहे. त्यामुळे १० लाख ५६ हजार इतके मतदार गेल्या वर्षीपेक्षा कमी झाले आहेत. त्यात यंदा नव्याने ४ लाख ४३ हजार ५०० मतदारांची नोंदणी करण्यात निवडणूक आयोगाला यश मिळाले आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले. राज्यात गेल्या वर्षी ६ लाख ६२ हजार १५१ दिव्यांग मतदारांची नोंदणी होती, त्यात यंदा १५ हजार ३३२ ने वाढ झाली आहे. तर मतदान ओळखपत्रावर छायाचित्र नसल्याने ६ हजार २५७ मतदारांची नावे वगळण्यात आली.तर २ हजारांहून अधिक मतदारांचे छायाचित्र टाकण्यात यशमिळवल्याचे निवडणूक आयोगाने सादर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक