शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा प्रकरणांबाबत १५ दिवसांत धोरण! शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:38 IST

शैक्षणिक संस्थांमध्ये सात वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबत शिक्षण विभागाकडून १५ दिवसांत धोरण निश्चित केले जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.

मुंबई : शैक्षणिक संस्थांमध्ये सात वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबत शिक्षण विभागाकडून १५ दिवसांत धोरण निश्चित केले जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. २०११ सालापासून प्रलंबित अनुकंपा प्रकरणांना २८ फेब्रुवारी २०१९पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत शिक्षण विभागाकडून स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) जारी करण्याबाबत आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेख केला होता. त्यानुसार विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी मंगळवारी विशेष बैठक बोलाविली असताना तावडे यांनी हे आश्वासन दिले.या बैठकीत तावडे यांच्यासह आमदार डावखरे, शालेय शिक्षण विभाग, वित्त आणि सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यात अनुकंपा प्रकरणांना सामान्य प्रशासन विभागाप्रमाणेच शिक्षण विभागानेही दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती आमदार डावखरे यांनी केली. शिक्षकांच्या अनुकंपा नोकरीबाबत सरकारचे सहानुभूतीचे धोरण आहे.त्यामुळे शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या अनुकंपा भरतीला मुदतवाढ देण्याबाबत स्वतंत्र जीआर लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या १५ दिवसांत अनुकंपा भरतीबाबतच धोरण ठरविण्यात येईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.- कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये २०११पासून अनुकंपा तत्त्वावर एकही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयांमधील अकाली निधन झालेल्या कर्मचाऱ्यांची मुले न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट असल्याकडेही डावखरे यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे