शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

महामंडळांच्या ठेवींमध्ये १४३ कोटींचा अपहार

By admin | Updated: March 12, 2016 04:22 IST

राज्यातील विविध महामंडळे आणि प्राधिकरणांनी विविध बँकांमध्ये एफडीमध्ये गुंतविलेल्या रकमेत १४३ कोटी रुपयांचा अपहार झाला असल्याची कबुली वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत दिली.

यदु जोशी,  मुंबईराज्यातील विविध महामंडळे आणि प्राधिकरणांनी विविध बँकांमध्ये एफडीमध्ये गुंतविलेल्या रकमेत १४३ कोटी रुपयांचा अपहार झाला असल्याची कबुली वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत दिली. ‘लोकमत’ने गेल्या महिन्यात या एफडी घोटाळ्यावर प्रकाश टाकला होता. महामंडळे/प्राधिकरणांच्या ठेवींबाबत पारदर्शक पद्धत आणली जाईल, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले. महामंडळे आणि प्राधिकरण आपल्या पातळीवर गुंतवणुकीचे निर्णय घेतात. वित्त विभाग वा सरकारपर्यंत हा विषय येत नाही, असे मुनगंटीवार यांनी सांगताच दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी या मनमानीला चाप लावण्याची जोरदार मागणी केली. तेव्हा या ठिकाणी गुंतवणूक करण्याची पद्धत, अधिकार यात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारला शिफारस करण्याकरिता आमदार आणि तज्ज्ञांची एक समिती लवकरच नेमण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी जाहीर केले. भाजपाच्या शोभाताई फडणवीस, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, काँग्रेसचे भाई जगताप आदींनी प्रश्नोत्तराच्या तासात कोट्यवधी रुपयांच्या एफडी घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरले. २०१३ ते १४ या काळात ही गुंतवणूक करण्यात आली होती. त्याची सीबीआय चौकशी करण्यात आली आणि अलीकडेच सीबीआयने न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे. सात जण अटकेत आहेत. त्यात एजंट, लाभार्थी आणि संबंधित बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. देना बँक, विजया बँकेत ही रक्कम गुंतविण्यात आली होती, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, सुटाबुटातील बदमाश एजंट महामंडळे/ प्राधिकरणांमध्ये जायचे, जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवी मिळवायचे. बोगस एफडी पावत्या द्यायचे आणि मूळ पावत्यांवर ओडीआर घेऊन ती रक्कम पुढे आरटीजीएसने आपल्या फर्मकडे वळवायचे, असा हा घोटाळा होता.सुटाबुटातील एजंटांवर अधिकाऱ्यांनी विश्वास ठेवला तरी कसा, असा सवाल करीत या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली; पण मुनगंटीवार यांनी ती मान्य केली नाही. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना टेबलखालून पैसा दिला जात होता, असा आरोपही विरोधकांनी केला.