शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

‘निम्न तेरणा’चे १४ दरवाजे उघडले

By admin | Updated: October 4, 2016 20:10 IST

लोहारा तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्प मंगळवारी पहाटे पाच वाजता शंभर टक्के भरल्यामुळे धरणाचे दोन दरवाजे १० सेंटीमिटरने उघडून प्रती सेकंद

ऑनलाइन लोकमतलोहारा/माकणी, दि. 04 -  लोहारा तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्प मंगळवारी पहाटे पाच वाजता शंभर टक्के भरल्यामुळे धरणाचे दोन दरवाजे १० सेंटीमिटरने उघडून प्रती सेकंद २१ क्युसेक प्रमाणे पाणी नदी पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, यानंतरही प्रकल्पात पाण्याचा वेग वाढत असल्याने दुपारी दोन वाजता सर्वच १४ दरवाजे १० सेंटीमिटरने तर दुपारी तीन वाजता या १४ पैकी चार दरवाजे २० सेंटीमिटरने उघण्यात आले असून, यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेल्या लोहारा तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्पात १ जूनला केवळ २.१२१ दशलक्ष घनमिटर इतकाच पाणी साठा होता. यावर्षी पावसाळा सुरु झाला त्यात सुरूवातीला पाऊस चांगला झाला. त्यामुळे प्रकल्पातील साठ्यात काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, मागील पाच-सहा दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पात चांगले पाणी वाढत आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता १२१ दलघमी इतकी असून, २३ सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत यात ३५.६०९ दलघमी इतका पाणीसाठा होता. २४ सप्टेंबर रोजी तो ५४.३७४ दलघमीवर पोहोंचला. यानंतर मात्र मागील पाच-सहा दिवसातील पावसामुळे साठ्यात वाढ होत जावून मंगळवारी पहाटे हा प्रकल्प शंभर टक्के भरला. त्यामुळे पहाटे पाच वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंटीमिटरने उघडून प्रती सेकंद २१ क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर प्रकल्पात पाण्याचा वेग वाढत असल्याने अकरा वाजता दोन, बारा वाजता दोन तर दुपारी तीन वाजता सर्वच १४ दरवजे १० सेंटीमिटरनेने उघडण्यात आले. मात्र, त्यानंतरही प्रकल्पात पाण्याची अवक वाढतच असल्याने १४ पैकी चार दरवाजे २० सेंटीमिटरने उघडून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, उपविभागिय अधिकारी व्ही. जी. कांबळे, शाखाधिकारी डी.व्ही. कदम, शाखाधिकारी योगीराज माने, शाखाधिकारी आर. डी. भंडारे, बी. एस. बारुळे, एस. एम. कंदले, पी. एम. मंडोळकर, भाल जाधव, धनाजी कदम, ए. एस. कोळी, एम. जी. डांगे आदी कर्मचारी धरणाच्या पाणी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

माकणी-लातूर रस्ता बंदमागील आठ वर्षांपासून मृतसाठ्यात आलेला माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प मंगळवारी ‘फुल्ल’ झाल्यानंतर धरणाचे सर्वच दरवाजे उचलून यातील पाणी तेरणा नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे माकणी-लातूर मार्गावरील पूल पाण्याखाली येवून वाहतूक बंद झाली आहे. याशिवाय नदी पात्रावरील सारणी, जूने सास्तूर, रेबे चिंचोली, राजेगाव या गावाना आतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राजेगाव येथील बंधाऱ्याचेही सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.

बाजारकरूंचे हालमाकणी येथे मंगळवारी आठवडी बाजार असल्याने मातोळा, हसलगण, देवतळा, लोहटा, सारणी येथील नागरिक बाजारासाठी माकणी येथे येतात. मात्र, दुपारी आचानक पुलावरून पाणी वाढल्याने व वाहतूक बंद झाल्याने बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची तारांबळ झाली. लातूर व औसा आगाराच्या येणाऱ्या सर्वच बसगाड्या बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. तसेच तेरणा धरणाच्या व तेरणा नदी परिसरातील हजारो एकर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला.