शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

१४ मृतदेह सापडले कित्येक मैलांवर

By admin | Updated: August 5, 2016 05:35 IST

सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १४ मृतदेह गुरुवारी घटनास्थळापासून कित्येक मैल दूरवर सापडले.

जयंत धुळप/संदीप जाधव,

महाड- मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक मंगळवारी रात्री सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १४ मृतदेह गुरुवारी घटनास्थळापासून कित्येक मैल दूरवर सापडले. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे इतर बेपत्ता व्यक्तीही कदाचित समुद्रापर्यंत वाहत गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.पुलासह नदीपात्रात पडलेल्या तवेरा जीपमधील रंजना वझे यांचा मृतदेह घटनास्थळापासून १ कि.मी. अंतरावर महाड शहराजवळ केंबुर्ली नदी किनाऱ्यावर एका शेतात आढळला. तर याच गाडीतील शेवंती मिरगल यांचा मृतदेह त्याहून खूप पुढे ८० कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर सापडला. जयगड-मुंबई एसटी बसचे चालक श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह ९० कि.मी. अंतरावर दापोली तालुक्यातील आंजर्ले किनारी तर आवेद अल्ताफ चौगुले या राजापूर-मुंबई एसटी बसमधील प्रवाशांचा मृतदेह दादली पुलाजवळ, पांडुरंग घाग राजापूर यांचा केंबुर्लीजवळ, प्रशांत माने यांचा मृतदेह ३५ कि.मी. अंतरावर म्हसळा तालुक्यातील तोराडी बंडवाडी खाडीकिनारी सापडला. स्नेहा बैकर यांचा मृतदेहदेखील २ किमीवरील राजेवाडी नदीकिनारी आढळून आला. याशिवाय सुनील बैकर, नेहा सुनील बैकर, रमेश कदम, प्रभाकर शिर्के, मंगेश कदम, अनिल संतोष बलेकर, जयेश गोपाल पाने, बालकृष्ण परब यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी आणण्यात आले असून, त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. इतर बेपत्ता वाहनांचा तसेच प्रवाशांचा तपास लागत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले. एखादा मृतदेह सापडल्याचे वृत्त मदत केंद्रात समजताच उपस्थित असलेल्या नातेवाइकांमध्ये घबराट निर्माण होत होती. आपल्याच नातेवाइकांचा हा मृतदेह असावा या आशेने दोन दिवस तळ ठोकून बसलेले हे सर्व नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात धाव घेत होते. मृताची ओळख पटल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्यांना अश्रू अनावर होताना दिसून येत होते.>इतरांचा शोध सुरूच>सागरी तटरक्षक दल, एनडीआरएफ, नौदल आदी यंत्रणांनी बुधवारी पहाटेपासून सुरू केलेले शोधकार्य गुरुवारी दुसऱ्या दिवशीदेखील युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून आले. तीनशे किलो वजनाचे लोहचुंबक पाण्यात सोडून क्रेनच्या साहाय्याने वाहनांचा नदीत शोध घेण्याचे एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत तरी या बेपत्ता वाहनांचा शोध घेण्यात अपयश आले. नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारेदेखील शोधमोहीम सुरूच होती.ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी संपूर्ण दगडी कातळ असल्याने दुर्घटनेच्या ठिकाणी वाहने न सापडता ती पुढे वाहून गेली असावीत, अशी शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.>जोरदार प्रवाहामुळे अडचणीसुसज्ज यंत्रणा असूनही पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे तसेच जोरदार प्रवाहामुळे नदीत बेपत्ता वाहनांचा तसेच प्रवाशांचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे एनडीआरएफचे निरीक्षक महमद शफिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. डेप्युटी कमांडर पंडित इथापे यांच्या नेतृत्वाखाली १०३ जवान मदतकार्य करीत असल्याचे शफिक यांनी सांगितले. घटनास्थळापासून सुमारे १० किमी अंतरावरील पादली पुलापर्यंतच्या प्रवाहात बोटिंग डिप डायव्हर्स आॅक्सिजनयुक्त यंत्रणेद्वारे शोधकार्य सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेची पाण्याखाली शोध घेऊ शकणारी यंत्रेही शोधमोहिमेत वापरण्यात येत आहेत.व्हीआयपी दौऱ्यांची अडचणदासगांव : गेले दोन दिवस मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाला भेट देत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाला वारंवार पुलावरील वाहतूक बंद करावी लागते. शिवाय, स्थानिक ग्रामस्थांना तसेच कर्मचाऱ्यांना काही अधिकाऱ्यांच्या अरेरावीचा सामना करावा लागत आहे.न्यायालयीन चौकशीपूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. याच दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तीन तज्ज्ञांची एक समिती गठीत केली असून, या समितीने कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू केले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. - सविस्तर वृत्त/१०