शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळातील गोंधळात १४ विधेयके मंजूर; आम्हाला बोलू दिले नाही, विरोधकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 06:30 IST

हिवाळी अधिवेशन : आरक्षणाच्या मागणीवरून जुंपली

मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या गोंधळात गेल्या दोन दिवसात कोणत्याही चर्चेविना १४ विधेयके मंजूर झाली. शालेय शुल्कवाढी सारख्या महत्वाच्या विधेयकाचा यात समावेश आहे. आम्हाला या विधेयकांवर चर्चा करायची होती, पण सत्ताधारी पक्षाचे सदस्य गोंधळ घालून विरोधकांना बोलू देत नाहीत. सरकारला कामकाज गुंडळण्याची घाई झाली आहे, असा आरोप विरोधकांनी केला.

विधिमंडळात सोमवारी पाच आणि मंगळवारी ९ अशी एकूण १४ विधेयके मंजूर झाली. कामकाज रेटून नेण्याच्या या कृतीवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, कोणतीही चर्चा न होता १४ बिले मंजूर झाली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना देखील विधेयकांवर चर्चा करायची होती. परंतु संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट सर्व बिले घ्या, असे सांगत होते. बापटांना एवढी काय घाई होती? सकाळी सभापतींच्या बैठकीला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे १ तास उशिरा आले. ज्येष्ठ मंत्र्यांना बाजूला सारुन मुख्यमंत्री राजकारण करत आहेत, असा आरोपही पवार यांनी केला.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, याआधी ५१ अहवाल मांडले गेले नाहीत असे समर्थन मुख्यमंत्री करत असले तरी हा अहवाल विशिष्ट परिस्थितीत बनवला गेला. याआधी कोणतेही अहवाल सभागृहात मांडा, अशी मागणी झालेली नव्हती. धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दलचा अहवाल सरकार मांडत नाही. मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देण्याचा अध्यादेश काढत नाही. अहवाल सभागृहात मांडण्यास मनाई असल्याचे तरी कायद्यात कुठे नमूद केले आहे, असा सवालही विखे पाटील यांनी केला.न्यायालयात बोगस कागदपत्रांच्या आधारे १२५ आरोपींना जामीनन्यायालयात १२५ पेक्षा अधिक आरोपींना बोगस कागदपत्रांच्या आधारे जामीन देऊन सुटका करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे येथे हे प्रकार घडले. भाजपाचे योगेश सागर यांनी या बाबत तारांकित प्रश्न विचारला होता. कल्याणला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.मुख्यमंत्री आक्रस्ताळे!विरोधकांनी मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल विधानसभेत शांतपणे आपले मत मांडले होते. सकाळी सभापतींनी बोलावलेल्या बैठकीत देखील त्यावर चर्चा झाली होती. मात्र सुसंस्कृत आणि उच्च विद्याविभूषित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पध्दतीने आक्रस्ताळेपणा करत भाषण केले. मुख्यमंत्र्यांना ते शोभणारे नव्हते, अशी टीका अजित पवार यांनी केली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा