शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

१३/७ स्फोटांचा फायनान्सर अटकेत

By admin | Updated: July 17, 2014 02:27 IST

तीन वर्षांपूर्वी मुंबईत घडलेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांचा फायनान्सर अब्दुल मतीन दामदा फकी ऊर्फ फारूक याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गोव्यातील इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या मदतीने अटक केली.

मुंबई : तीन वर्षांपूर्वी मुंबईत घडलेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांचा फायनान्सर अब्दुल मतीन दामदा फकी ऊर्फ फारूक याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गोव्यातील इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या मदतीने अटक केली. मतीनने मुंबई स्फोटांसाठी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेला दुबईतून हवालामार्फत १० लाख रुपये धाडले होते.१३ जुलै २०११ रोजी मुंबईत आॅपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि कबुतरखान्याजवळ बॉम्बस्फोट घडले होते. या स्फोटांचा मुख्य सूत्रधार मोहंमद अहमद सिद्धीबाप्पा ऊर्फ यासीन भटकळसह एकूण सात आरोपी गजाआड आहेत. या आरोपींच्या चौकशीतून मुजफ्फर कोला आणि मतीन या दोघांची नावे उघड झाली. तसेच मतीन हा मुजफ्फरचा मेहुणा असून, या दोघांनी हे बॉम्बस्फोट घडविण्यासाठी यासीन भटकळ आणि साथीदारांना लाखो रुपयांचे फायनान्स केल्याची माहिती समोर आली होती. एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटांचा कट शिजल्यानंतर मतीनने दुबईतून हवालामार्फत १० लाख रुपये दिल्लीतील ज्वेलर कन्वर पथीजा याच्याकडे पाठवले होते. यासीनने पथीजाकडून १० लाख घेतले होते. अटक आरोपींमध्ये कन्वरचा सहभाग असून मुजफ्फर, मतीन यांच्यासह एकूण सात आरोपी फरार होते. या सातही आरोपींविरोधात विशेष मोक्का न्यायालयाने अजामीनपात्र वॉरन्ट जारी केले तसेच या सर्वांविरोधात देशभरातील सर्व विमानतळांवर लूक आऊट सर्क्युलरही जारी करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक विमानळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्याकडे स्फोटातील सातही फरार आरोपींचे फोटो आणि तपशील होते. दरम्यान, मतीन सोमवारी दुबईहून गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानळावर उतरला. विमानतळावर उतरून घाईघाईने बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्या मतीनला तेथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ओळखले. लगोलग त्याला ताब्यात घेण्यात आले. एटीएस अधिकाऱ्यांना कळवून मतीनला दांबोली विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले. एटीएसने त्याला मुंबईत आणून अटक केली. (प्रतिनिधी)