मुंबई - सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१.२१ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
खालील प्रमाणे मिळणार मदत
सातारा - जिल्ह्यातील ११ हजार ११३ शेतकऱ्यांच्या चार हजार २१९.२८ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी सहा कोटी २९ लाख तीन हजार रुपये
कोल्हापूर - जिल्ह्यातील पाच हजार ८६० शेतकऱ्यांच्या एक हजार ६९६.३६ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी तीन कोटी १८ लाख रुपये
बीड - आठ लाख सहा हजार ५१३ शेतकऱ्यांच्या सहा लाख ४४ हजार ९१८.५५ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी ५७७ कोटी ७८ लाख ९२ हजार रुपये.
धाराशिव - चार लाख चार हजार ६५६ शेतकऱ्यांच्या तीन लाख ११ हजार २९१.२३ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २९२ कोटी ४९ लाख २२ हजार रुपये
लातूर - चार लाख १५ हजार ४९२ शेतकऱ्यांच्या २३ लाख सहा हजार ६२८.९९ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २०२ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये
परभणी - चार लाख ३९ हजार २९७ शेतकऱ्यांच्या दोन लाख ८५ हजार ८५३.७८ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २४५ कोटी ६४ लाख ४९ हजार
नांदेड - ८३ हजार २६७ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ७३.०२ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी २८ कोटी ५२ लाख ३७ हजार रुपये.
दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरीत होईल असंही मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.
Web Summary : Maharashtra allocates ₹1356 crore to aid 21 lakh farmers in Satara, Kolhapur, Beed, and other districts affected by heavy rains and floods in September 2025. The aid will support damaged crops. Direct assistance will be provided for deaths, livestock loss, and housing damage.
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने सितंबर 2025 में भारी बारिश और बाढ़ से प्रभावित सातारा, कोल्हापुर, बीड और अन्य जिलों के 21 लाख किसानों को सहायता के लिए ₹1356 करोड़ आवंटित किए। यह सहायता क्षतिग्रस्त फसलों के लिए होगी। मृत्यु, पशुधन हानि और आवास क्षति के लिए सीधी सहायता प्रदान की जाएगी।