आकोट (अकोला) : आकोट-अंजनगाव मार्गावरील मयुरी हॉटेलजवळ भाडोत्री प्रवासी वाहनातून एका इसमाजवळून १ लाख ३१ हजाराची रोख रक्कम निवडणूक विभागाच्या पथकाने शुक्रवारी जप्त केली. ही रक्कम जप्त करण्यात आली असून, ती निवडणुकीच्या वापराकरिता आणली होती का, याची चौकशी सुरू आहे. आकोट-अंजनगाव मार्गावर एमएच ३0 ई ९२१९ क्रमांकाच्या भाडोत्री प्रवासी वाहनामधून अकोल्यातील रवींद्र दशरथ गोखे यांच्याकडून १ लाख ३१ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. गोखे यांनी ही रक्कम आसनदास लोकुमल वाघवाणी यांच्या किराणा दुकानाच्या वसुलीची असल्याचे निवडणूक विभागाच्या पथकास सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी शैलेष हिंगे यांनी ही रक्कम जप्त करून कोषागारात ठेवली असून, याबाबत चौकशी सुरू आहे. ही कारवाई पथक प्रमुख धानोकार, सहाय्यक पथकप्रमुख मंडळ अधिकारी गवई यांनी केली.
अकोला जिल्ह्यात १.३१ लाख रूपये जप्त
By admin | Updated: October 11, 2014 00:34 IST