शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१३०० कि.मी. प्रवासानंतर घर मिळाले, जोडीदारही मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:39 IST

वाघाचा संसार फुलणार : अभयारण्यातील प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तब्बल १३०० किलोमीटरचा प्रवास करून गेल्या काही महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात स्थिरावलेल्या ‘टी-१सी-१’ वाघाचा संसार फुलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीत अभयारण्यात वाघीण सोडण्यावर एकमत झाले. तत्पूर्वी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज असल्याचे समितीतील सदस्यांनी स्पष्ट केले.ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघाच्या अधिवासाबद्दल एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एम. एस. रेड्डी अध्यक्ष असून राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीब आणि अकोल्याचे विभागीय वनाधिकारी एम. एन. खैरनार हे सदस्य आहेत. राष्टÑीय व्याघ्र प्राधिकरणाने निर्देशित केलेले मानद वन्यजीव सदस्य जयंत वडतकर हेही सदस्य आहेत. सोमवारी अमरावतीत या समितीची बैठक झाली. ‘टी-१सी-१’ काही महिन्यांपासून या अभयारण्यात स्थिरावला आहे. या पार्श्वभूमीवर वाघांच्या अधिवासाबाबत हा परिसर किती योग्य आहे? या ठिकाणी वाघीण सोडण्यापूर्वी काय काळजी घ्यायची, यावर बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक वाघ हा क्षेत्र, अन्न किंवा वाघीण यासाठी जंगल सोडतो. ‘टी-१सी-१’ गेल्या काही महिन्यांपासून ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे. त्याला अन्नासोबत योग्य अधिवास याठिकाणी मिळाल्याचे सध्यातरी दिसत आहे, अशी माहिती वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीब यांनी दिली. या अभयारण्यात वाघ किंवा वाघीण सोडण्याआधी सुरक्षित कॉरिडॉर आणि अभयारण्यातील चराई, रस्ता या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.यवतमाळपासून बुलडाण्यापर्यंत...यवतमाळ जिल्ह्यातील टीपेश्वर अभयारण्यातून सुरू झालेला या वाघाचा प्रवास ‘ज्ञानगंगा’मध्ये येऊन थांबला. टीपेश्वरमध्ये २०१६ जन्मलेल्या या ‘टी-१सी-१’ वाघाने जूनमध्ये टीपेश्वर सोडले. तेलंगणातील आदिलाबाद, पुढे नांदेड विभाग करीत तो किनवटला पोहोचला. पैनगंगा अभयारण्यात त्याने बराच काळ घालविला.आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्याने अकोला विभागात प्रवेश केला आणि महिन्याच्या शेवटी बुलडाणा जिल्ह्यात पोहोचला. चिखली, खामगाव करीत एक डिसेंबरला तो ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला. रेडिओ कॉलरमुळे त्याचा हा सर्व प्रवास जगासमोर आला. तब्बल १५० दिवसांमध्ये महाराष्टÑ आणि तेलंगणातील सात जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करून तो बुलडाण्यात स्थिरावला.

टॅग्स :Tigerवाघ