शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षांच्या मुलीस कोंडून डॉक्टरने केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:07 IST

ही मुलगी काही औषधे आणण्यासाठी वर्मा याच्या दवाखान्यात गेली होती. त्याने गुंगी आणणारे औषध देऊन तिला कोंडले व बलात्कार केला

१३ वर्षांच्या मुलीस कोंडून डॉक्टरने केला बलात्कारमुजफ्फरनगर : १३ वर्षांच्या एका मुलीला तीन दिवस दवाखान्यात कोंडून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सोनु वर्मा या डॉक्टरला अटक केली.मंडल पोलीस अधिकारी एस. के. एस. प्रताप यांनी सांगितले की, तीन दिवसांनंतर ही मुलगी दवाखान्यातून पळाली. झाला प्रकार सांगितल्यावर तिच्या वडिलांनी फिर्याद नोंदविली. वडील व गावकरी तीन दिवस मुलीचा शोध घेत होते. ही मुलगी काही औषधे आणण्यासाठी वर्मा याच्या दवाखान्यात गेली होती. त्याने गुंगी आणणारे औषध देऊन तिला कोंडले व बलात्कार केला, असा आरोप आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले व डॉक्टरच्या दवाखान्याला सील ठोकण्यात आले. (वृत्तसंस्था)दोन विद्यार्थिनींवर शिक्षकाचा बलात्कारउत्तर दिनाजपूर (प. बंगाल) : जिल्ह्यातील एका सरकारी अनुदानित प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या दोन विद्यार्थिनींवर शिक्षकाने शाळा संपल्यानंतर सलग चार दिवस बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे.३५ वर्षांचा हा विवाहित शिक्षक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोनपैकी एका पीडित मुलीने शनिवारी शाळेत जाण्यास नकार दिला. पालकांनी कारण खोदून खोदून विचारल्यावर मुलीने झाला प्रकार सांगितला व दुसऱ्या पीडित मुलीचे नावही सांगितले. दुसºया मुलीनेही पहिलीच्या सांगण्याला दुजोरा दिला. त्यानंतर, दोन्ही मुलींच्या वडिलांनी राजगंज पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. नंतर राजगंज सरकारी इस्पितळात केलेल्या तपासणीत दोघींवरही बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. (वृत्तसंस्था)१७ वर्षांच्या पित्याने केला २ महिन्यांच्या मुलाचा खूनलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मंगोलपुरी भागात स्वत:च्या दोन महिन्यांच्या मुलाचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी १७ वर्षांच्या पित्याला अटक केली. त्याची पत्नी १६ वर्षांची असून तिला हा मुलगा अनैतिक संबंधांतून झाल्याच्या संशयातून त्याने हा खून केला.निपचित झालेल्या या मुलाला त्याची आई इस्पितळात घेऊन आली, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा गळा आवळल्याच्या खुणा दिसल्या. पोलिसांनी आईकडे चौकशी केली असता तिने तिच्या पतीवर संशय व्यक्त केला. काही तासांतच या मुलाच्या १७ वर्षाच्या पित्याला अटक झाली. त्याने मुलाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. या अल्पवयीन दाम्पत्याने वर्षभरापूर्वी मंदिरात विवाह केला होता. यातील पत्नी सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानात नोकरी करते. तिचा पती मात्र अमली पदार्थांचा व्यसनी असून काही कामधंदा करत नाही. सुरुवातीस मुलीच्या घरच्यांनी विवाहास विरोध केला पण ती गरोदर राहिल्यावर ते लग्न करून देण्यास राजी झाले होते. शनिवारी सायंकाळी पत्नी कामावर गेलेली असताना हा १७ वर्षांचा पती नशेत घरी आला. खरे तर तान्ह्या मुलाला त्याच्या भरवशावर घरात ठेवून पत्नी कामावर गेली होती. मुलगा रडू लागल्यावर या पोरसवदा बापाने आधी त्याला चपलेने मारले व नंतर गळा आवळून त्याचे रडमे बंद करम्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कार