शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

१३ वर्षीय मुलाची आत्महत्या, पोलिसांचा मोबाईल गेमवर संशय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:44 PM

विनायकनगर येथे राहणा-या दानिश अफजल शेख (१३) या शाळकरी मुलाने बुधवारी (दि.१६ ) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी दानिश घरात एकटाच असल्याने पोलिसांनी तो वापरत असलेला मोबाईल आज तपासासाठी ताब्यात घेतला आहे.

ऑनलाईन लोकमत 

आष्टी (बीड ), दि. १७ : विनायकनगर येथे राहणा-या दानिश अफजल शेख (१३) या शाळकरी मुलाने बुधवारी (दि.१६ ) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी दानिश घरात एकटाच असल्याने पोलिसांनी तो वापरत असलेला मोबाईल आज तपासासाठी ताब्यात घेतला आहे. मोबाईलवरील गेमच्या आहारी जाऊन ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त करत शहर पोलिसांनी मोबाईल पुढील तपासासाठी  सायबर क्राईम विभागाकडे सुपूर्द केला आहे.

अफजल शेख व मिनाज हे दोघेही शिक्षक आहेत. त्यांना दोन मुले आहेत , दानिश हा त्यांचा लहान मुलगा होत. बुधवारी दानिशच्या शाळेला सुटी असल्याने तो घरी एकटाच होता तर त्याचे आईवडील दोघेही त्यांच्या शाळेवर गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास त्याची आई मिनाज या घरी आल्यानंतर त्यांना दानिशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व शवविच्छेदनानंतर अकस्मात मृत्यूची नोंद बुधवारी रात्री केली. 

आज पुढील तपास करताना पोलिसांनी दानिश घरात एकटा असताना त्याच्याजवळ असणारा मोबाईल संच ताब्यात घेतला. मोबाईल गेमच्या व्यसनामुळे हि घटना झाली असल्याचा संशय यावेळी पोलिसांनी व्यक्त करत मोबाईल सायबर क्राईम विभागाकडे तपासणीसाठी पाठवला आहे. मोबाईलला पर्सनल कोड असल्याने याच्या तपासणीनंतरच सर्व प्रश्नांची उकल होईल. 

दानिशला व्हायचे होते डॉक्टरअभ्यासात चुणचुणीत असणारा दानिश हा शाळेतील विविध स्पर्धा परीक्षा, चाचण्यांमध्ये नेहमीच अग्रेसर असायचा. मी मोठ्या भावासारखे इंजिनियरींग करणार नसून मला डॉक्टर व्हायचे आहे, असे तो नेहमी सांगत असल्याचे त्याचे वडील अफजल शेख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

मोबाईल तपासणीनंतरच सत्य कळेल दानिश घरात एकटा असताना त्याच्याजवळचा मोबाईल आम्ही ताब्यात घेतला आहे. परंतु, तो पासवर्ड प्रोटेक्टेड असल्याने त्यास सायबर क्राईम विभागाकडे सोपविण्यात आला आहे. मोबाईल उघडल्यानंतर सत्य बाहेर येईल.- प्रकाशकुमार पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, आष्टी