शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 02:25 IST

विभागीय मंडळ : १० मिनिटांहून अधिक विलंब झाल्यास परीक्षा देता येणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी बसवायचे आहेत, १३ वा विद्यार्थी हा दुसऱ्या वर्गात बसविण्याची व्यवस्था केंद्रप्रमुखांनी करावी, अशा सूचना विभागीय मंडळांनी फेरपरीक्षेच्या शाळांच्या केंद्रप्रमुखांना दिल्या.मुंबई विभागीय मंडळाकडून फेरपरीक्षा पार पडणार आहेत. तेथील केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत अर्धा तास विद्यार्थी उशिरा पोहोचल्यास त्याला परीक्षा देण्याची परवानगी होती, मात्र या परीक्षेला केवळ १० मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यालाच परीक्षा केंद्रात प्रवेश मिळू शकेल.प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क लावणे बंधनकारक असून सुरक्षितता व स्वच्छतेच्या इतर सुविधांसाठी केंद्रांना मंडळाकडून २००० रुपये अग्रीम रक्कम देण्यात येईल. केंद्रातील प्रवेश आणि बाहेर जाण्याचे नियोजन करताना विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर राखले जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फेरपरीक्षेच्या वेळी पोलीस बंदोबस्त नेहमीसारखाच कडक असणार असून केंद्रप्रमुखांनी उपस्थिती, गैरहजर, गैरप्रकार, संसर्गित विद्यार्थी रुग्ण या सर्वांची नोंद व माहिती ऑनलाइन करून ती लगेच मंडळांना कळवायची आहे.रनर केंद्रावरच थांबणारल्ल दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कस्टोडियनकडून प्रत्येक शाळेतप्रश्नपत्रिकांचे संच पोहोचवणारे रनर केवळ केंद्रांवरील बैठक व्यवस्था पाहणार आहेत.ल्ल प्रश्नपत्रिका दिल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत संबंधित केंद्रातच ते थांबतील. यामुळे पेपरफुटीला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला.साहित्य अपुरे पडण्याची भीतीमंडळाकडून फेरपरीक्षा केंद्रावर प्रत्येकी १०० ते ११० विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझरचे ५ लीटरचे कॅन, २ थर्मल गन, दोन हँड्स स्प्रे देण्यात येतील. फेरपरीक्षा १० दिवस असेल. त्यामुळे इतक्या दिवसांसाठी हे साहित्य पुरेसे होईल का, असा प्रश्न केंद्रप्रमुखांना पडला आहे.

टॅग्स :examपरीक्षा