शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रोज १२ बलात्कार, महिलांची सुरक्षा वाºयावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 05:09 IST

महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कितीही उपाययोजनांचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचाराचा आलेख वाढतच असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात रोज १२ बलात्कार होत असून ३४ विनयभंगाच्या घटना होत आहेत. तसेच २० अपहरण तर सरासरी १७ महिलांना कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागत आहे.

- जमीर काझीमुंबई  - महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कितीही उपाययोजनांचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचाराचा आलेख वाढतच असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात रोज १२ बलात्कार होत असून ३४ विनयभंगाच्या घटना होत आहेत. तसेच २० अपहरण तर सरासरी १७ महिलांना कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या एकूण ३२ हजार ५३ घटना घडल्या आहेत. २०१६च्या तुलनेत गुन्ह्यांची संख्या आठशेहून अधिक आहे.माहिती अधिकार कायद्यान्वये ही आकडेवारी पुढे आली आहे. राज्यात तीन वर्षांत बलात्काराच्या एकूण १२ हजार ६८९ घटना घडल्या आहेत, तर महिलांवरील विविध प्रकारच्या अत्याचाराच्या एकूण ९४ हजार ४५४ घटना घडल्या आहेत.अर्थात ही आकडेवारी केवळ पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्यांची आहे.प्रत्यक्षात अत्याचाराचे प्रमाण त्याहून अधिक असल्याचे सांगितले जाते. महाराष्टÑात तरुणी व महिलांवर होणाºया अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना व पथके बनविण्यात आली आहेत. तरीही त्यांच्यावरील गुन्ह्यांचा आलेख चढा राहिल्याचे वास्तव आकडेवारीतून पुढेआले आहे.२०१७ या वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या एकूण ३२ हजार ५३ घटना घडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ४३५६ बलात्कार, १२ हजार २३८ विनयभंग तर अपहरण आणि पती व माहेरील मंडळीकडून छळाच्या अनुक्रमे ७ हजार ११३ व ६२४२ घटना घडल्या आहेत. २०१६ व २०१५ मध्ये बलात्काराच्या घटना अनुक्रमे ४१८९ व ४१४४ इतक्या तर विनयभंगाचे गुन्हे अनुक्रमे ११ हजार ३९६ व ११ हजार ७१३ दाखल झाले आहेत, तर अपहरणाच्या ६,१६९ व ५,०९६ घटना घडल्या होत्या.गुणात्मक सुधारणा करणारमहिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक पोलीस घटकांमध्ये विशेष उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये गुणात्मक सुुधारणा करण्याची सूचना सर्व घटकप्रमुखांना करण्यात आली आहे. जेणेकरून तरुणी व महिलांसाठी अधिक निर्भय वातावरण निर्माण होईल.- कैसर खालिद (विशेष महानिरीक्षक,महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग)

टॅग्स :Rapeबलात्कारMaharashtraमहाराष्ट्र