शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

परिवहनच्या कामकाजावर ११३३ आक्षेप

By admin | Updated: July 22, 2016 02:35 IST

परिवहन सेवेने साहित्य, सुटे भाग, वंगणखरेदी करण्याकरिता बाह्यपक्षकार तसेच कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांना आवश्यकतेनुसार अग्रीम रक्कम दिली होती.

ठाणे : ठाणे परिवहनच्या कारभारात अनेक अनियमितता असून निधीच्या गुंतवणुकीपासून बसवरील जाहिरातींपर्यंत आणि केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानापासून साफसफाईच्या रकमेतील तफावतीपर्यंत अनेक घोटाळे २०१३-१४ सालच्या लेखापरीक्षण अहवालात उघड झाले आहेत. गेल्या २६ ते २७ वर्षांत लेखापरीक्षकांनी परिवहनच्या कारभाराबाबत नोंदवलेल्या ११३३ आक्षेपांना परिवहनच्या तत्कालीन प्रशासनाने धड उत्तरेही दिलेली नाहीत. परिवहन सेवेने साहित्य, सुटे भाग, वंगणखरेदी करण्याकरिता बाह्यपक्षकार तसेच कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांना आवश्यकतेनुसार अग्रीम रक्कम दिली होती. या रकमेचा विनियोग झाल्यानंतर तिचे समायोजनच झालेले नाही. या रकमेतील ८० टक्के रक्कम विविध साहित्य, सुटेभाग, वंगण खरेदीसाठी वापरण्यात आली आहे. या रकमेचे समायोजन न झाल्याने महसुली तूट आढळली आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर वाढत असतानादेखील परिवहन सेवेने तिकीटदरात वाढ न केल्याने महसुली खर्चात वाढ झाली आहे.

ठामपा व केंद्र, राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान कमी दाखवलेपरिवहन सेवेला ठामपाने ३२.१५ कोटी अनुदान दिले होते. तर, जेएनएनयूआरएमअंतर्गत २०० बस प्राप्त झाल्या. या बसवर येणारे २ कोटी ६० लाख ८५ हजार ६७३ रुपये हे घसारा निधीत जमा करण्याऐवजी ठामपा व केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून दोन वेळा कमी दर्शवल्याचा गंभीर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळेच टीएमटीची महसुली तूट ५ कोटी २१ लाख ७१ हजार ३४७ रुपयांनी कमी दर्शवली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या लेखापरीक्षण अहवालातही हा आक्षेप नोंदवला होता.निरनिराळ्या डिपॉझिटबाबतएमटीएनएलकडे फोनसाठी १ कोटी ७८ लाख २६१ रुपये डिपॉझिट भरले असताना कोणत्या दूरध्वनीसाठी किती रक्कम डिपॉझिट म्हणून जमा केली, याबाबतची तपशीलवार नोंद नाही. महावितरणकडून १२ ठिकाणी कनेक्शन घेतले असून त्यापोटी महावितरणला १ कोटी ५९ लाख ३१८ रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु, परिवहन सेवेला प्राप्त झालेल्या डिपॉझिटची रक्कम २ लाख ८५ हजार ६६५ एवढीच जमा दाखवली आहे.आस्थापनेवरील खर्च निर्देशापेक्षा जादाशासन निर्देशानुसार एकूण उत्पन्नाच्या ३५ टक्के रक्कम आस्थापनेवर खर्च होणे अपेक्षित असताना २०१३-१४ या आर्थिक वर्षात ८३.५४ टक्के जादा रक्कम खर्च केली आहे. परिवहनचे उत्पन्न हे ८६ कोटी ७७ लाख ०६ हजार ३६० असताना परिवहनने आस्थापनेवर ७२ कोटी ४९ लाख ०३ हजार ७९२ रुपये खर्च केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.ताळेबंदाप्रमाणे निधी तसेच गुंतवणुकीत तफावत२०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ताळेबंदाप्रमाणे परिवहन सेवेने निर्माण केलेल्या विविध राखीव निधीत जमा असलेल्या शिल्लक रकमा व निधीतील जमा रकमांची केलेली गुंतवणूक याबाबत प्रचंड तफावत आढळली आहे. त्यानुसार, भविष्य निर्वाह निधीच्या तफावतीमधील ८ लाख १५ हजार ३७१ रुपये आक्षेप नोंदवला आहे. तर, अग्रीम ५ कोटी ४२ लाख ३६ हजार १९८ रुपयांच्या रकमेचे समायोजन अद्याप झालेले नाही.साफसफाईच्या कामाच्या रकमेतही तफावतकळवा, वागळे, कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यालय व बस टर्मिनल्सची साफसफाई करण्यासाठी प्रतिदिन ५० कंत्राटी कर्मचारी पुरवणे गरजेचे आहे. परंतु, त्यांच्या देयकांमध्ये तफावत आढळली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१३ ची देयके तपासली असता दोन्ही सुपरवायझर गैरहजर असल्याचे आढळले. त्यांच्या गैरहजेरीपोटी दंडाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलातून कपात केलेली नाही.अपघात व नुकसानभरपाई२०१३-१४ या आर्थिक वर्षात परिवहनचे १०६ अपघात झाले असून त्यापैकी ३९ अपघातांच्या नुकसानभरपाईपोटी ५९ हजार १९० रुपयांची वसुली झाली आहे. तर, ६७ अपघातांच्या नुकसानीप्रकरणी बसेसच्या दुरुस्तीबाबत मूल्यांकन न केल्याने परिवहनचे आर्थिक नुकसान झाले आहे.पोलीस गॅ्रण्टपोटी ५ कोटी ७५ लाख बाकी२०१४ पर्यंत पोलीस आयुक्त कार्यालयाकडून पोलीस ग्रॅण्टपोटी ५ कोटी ७५ लाख ५७ हजार ६०४ रुपयांची वसुली अद्याप झालेली नाही.