शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

११३ ग्राम पंचायतमध्ये सार्वत्रिक, ५०८४ रिक्त सदस्यपदांची पोटनिवडणूक जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 20:36 IST

आयोगाचा कार्यक्रम : १२३ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त थेट सरपंचपदाचीही निवडणूक

अमरावती : राज्यात  १४ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० दरम्यान मुदत संपणाºया ११३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक, १२३ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेले थेट सरपंचपदाची पोटनिवडणूक, तसेच ३१५२ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असणाºया ५,०८४ सदस्यपदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी जाहीर केला. या सर्व ठिकाणी ८ डिसेंबर रोजी मतदान, तर ९ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

 निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने राबविली जाणार आहे. संबंधित सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव करणारी कोणतीही कृती, घोषणा, मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाºयांना आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही. यासर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

राज्यात ठाणे जिल्ह्यात ९ ग्रामपंचायती, रायगड ५, रत्नागिरी ६, नाशिक ४८, जळगाव ६, अहमदनगर १, पुणे १३, सातारा १३, कोल्हापूर २, सोलापूर २, उस्मानाबाद २, बीड १, वर्धा ३ व गडचिरोली जिल्ह्यात ५ अशा एकूण ११३ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे.असा आहे निवडणुकीचा कार्यक्रमसंबंधित तहसिलदारांद्वारा ६ नोव्हेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागविणे व सादर करणे -१६ ते २१ नोव्हेंबर (रविवार वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत), उमेदवारी अर्जाची छाननी - २२ नोव्हेंबर, उमेदवारी अर्जाची माघार- २५ नोव्हेंबर, उमेदवारांना चिन्ह वाटप - २५ नोव्हेंबर, मतदान- ८ डिसेंबर व मतमोजणी ९ डिसेंबरला जिल्हाधिकाºयांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील, त्या ठिकाणी होणार आहे.विभागनिहाय रिक्त ग्रा.पं. सरपंच व सदस्यपदेविभाग        सरपंच        सदस्यकोकण        २८        ७२९नाशिक        ०९        ७१९पुणे        ३९        १७५९औरंगाबाद    २२        ६५४अमरावती    २०        ६८९नागपूर        ०५        ५३४एकूण        १२३        ५०८४