शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

राज्यात दिवसभरात ११ हजार ५१४ रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६९ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 06:44 IST

मृत्युदर ३.५० टक्के; एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७९ हजार

मुंबई : राज्यात दिवसभरात ११ हजार ५१४ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३१६ मृत्यू झाले आहेत. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ झाली असून मृतांचा आकडा १६ हजार ७९२ झाला.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.९४ टक्के असून मृत्युदर ३.५० टक्के आहे. सध्या राज्यात १ लाख ४६ हजार ३०५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ३१६ मृत्यूंमध्ये मुंबई ५७, ठाणे ११, ठाणे मनपा २७, नवी मुंबई मनपा २, कल्याण-डोंबिवली मनपा ७, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी-निजामपूर मनपा ६, पालघर ४, वसई-विरार मनपा ६, रायगड ४, पनवेल मनपा १ आदी रुग्णांचा समावेश आहे.मुंबईत ५७ बळीमुंबईत गुरुवारी ९१० रुग्ण व ५७ मृत्यू झाले आहेत. शहर, उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २० हजार झाली असून बळींची संख्या ६ हजार ६४८ आहे. आतापर्यंत ९२ हजार ६५९ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २० हजार ५४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे व पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईच्या तुलनेत अधिक आहे, ठाण्यात २७ हजार १२ तर पुण्यात ४१ हजार सक्रिय रुग्ण आहेत.ठाण्याची रुग्णसंख्याही एक लाखाच्या पुढेराज्यात गुरुवारी ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला. ठाण्यात सध्या एकूण रुग्णसंख्या १ लाख ८७५ असून बळींचा आकडा २ हजार ८७९ आहे. आतापर्यंत ७० हजार ९८३ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या