शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

खुल्या प्रवर्गातील पदांना ११ महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 04:11 IST

मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोक-यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातून नियुक्ती करण्यात आली

मुंबई : मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोक-यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातून नियुक्ती करण्यात आली. या पदांना न्यायालयाने पुन्हा एकदा ११ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकºयांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अनेकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणीत एप्रिल २०१५मध्ये न्यायालयाने राज्य सरकारच्या वटहुकुमाला स्थगिती देत याचिकांवर अंतिम निकाल लागेपर्यंत सरकारी नोकºयांमध्ये १६ टक्के जागा रिक्त ठेवण्याचा आदेश सरकारला दिला.मात्र, या जागांवर तात्पुरत्या स्वरूपी खुल्या प्रवर्गातून नियुक्त्या करण्यात याव्यात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार सरकारने रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या.या याचिकांवरील सुनावणी प्रलंबित असल्याने यापूर्वी ४ मे रोजी न्यायालयाने सहा महिन्यांसाठी पदांवरील नियुक्त्यांना मुदतवाढ दिली. देण्यात आलेली ही मुदत३ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे आता ही मुदतवाढ ११ महिन्यांसाठी किंवा याचिकांवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत देण्यात यावी, असा विनंती अर्ज राज्य सरकारने गेल्या आठवड्यात न्यायालयात केला होता.मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांनी या अर्जावरील सुनावणीत राज्य सरकारची ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Courtन्यायालय