शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

११ कारखाने एफआरपी देतात, तर इतरांना काय धाड भरली आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 06:25 IST

ऊसदर नियंत्रण मंडळ बैठक; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विचारणा

मुंबई/कोल्हापूर : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे; मग उर्वरित १७४ कारखान्यांना धाड भरलीय का, असा बिनतोड सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत केला.

मंत्रालयात शुक्रवारी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील गाळप हंगाम, ऊसदर, आदीबाबत कारखान्यांचे व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसमवेत खडाजंगी चर्चा झाली.

साखरेचे दर घसरल्याने एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही, अशी ओरड बहुतांश साखर कारखाने करीत असले तरीही राज्यातील ११ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यंदाच्या हंगामात १८५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला असून आतापर्यंत ४२६.८४ लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. गाळप झालेल्या उसाची एकूण एफआरपी १० हजार ४८७ कोटी रुपये होत असून, त्यांपैकी पाच हजार १६६ कोटी रक्कम शेतकºयांना देण्यात आली आहे. अजूनही १७४ साखर कारखान्यांकडे पाच हजार ३२० कोटींची रक्कम थकीत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

गाळप केलेल्या कारखान्यांचे उत्पन्न विभागणी सूत्रानुसार दर काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दिले.ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची चौकशी करणारकाही कारखाने ऊसतोडणी व वाहतूक खर्च जास्त दाखवतात, त्यावर कुणाचे नियंत्रण नसते, त्यांची तपासणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. त्यानुसार साखर आयुक्तालयाने दर तपासावेत, असे निर्देशही मुख्य सचिव जैन यांनी या वेळी दिले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने