मालेगाव (जि. वाशिम) : कर्तव्यात दिरंगाई व गैरव्यवहार केल्याप्रकरणी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी सोमवारी अपात्र घोषित केले. १८ संचालक संख्या असलेल्या या समितीचे संचालक विजय भुतडा व इतर १२ संचालकांनी ६ जुलै २0१२ रोजी काही सदस्यांच्या गैरव्यवहाराबद्दल उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्याचप्रमाणे शंकर मगर यांनीही उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी केल्या होती. यानुसार २ फेब्रुवारी रोजी जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांच्या दालनात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपनिबंधकांनी ११ संचालकांना अपात्र घोषित केले. अपात्र घोषित केलेल्या संचालकांमध्ये सुरेश शिंदे (तत्कालीन सभापती), शिवाजीराव काळे, गजानन देवळे, पंडितराव लांडकर, आनंदराव देवळे, डॉ. जगदीश घुगे, रविकुमार भुतडा, प्रयागबाई जोगदंड, विजयकुमार भुतडा, बापुराव कुटे आणि संजयराव कुटे यांचा समावेश आहे. उर्वरित सात संचालकांमधून सभापती, उपसभापतीची निवड करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक खाडे यांनी दिले आहेत.
मालेगाव बाजार समितीचे ११ संचालक अपात्र
By admin | Updated: February 3, 2015 00:07 IST