शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ११ कोटी ५६ लाख मंजूर

By admin | Updated: May 19, 2016 03:22 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या विकासासाठी बांधील आहे. येथे सोयी-सुविधा वाढल्या तर पर्यटकांची संख्या वाढेल.

मुरुड-जंजिरा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या विकासासाठी बांधील आहे. येथे सोयी-सुविधा वाढल्या तर पर्यटकांची संख्या वाढेल. हा दूरदृष्टिकोन ठेवत मुरुड शहराला अंबोली धरणातून पाणीपुरवठा होण्यासाठी ११ कोटी ५६ लाख मंजूर करत शहरवासीयांना १० टक्के लोकवर्गणी भरावी लागू नये यासाठी विशेष प्रयत्न करून मंत्रिमंडळाकडून ती माफ करून घेतली. मुरुड शहरात समाज मंदिरे व तीर्थक्षेत्र अनुदान मिळवून देण्यात यशस्वी ठरल्याचे प्रतिपादन आमदार सुनील तटकरे यांनी केले.तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, आतिकभाई खतीब, फैरोज घालटे, नगरसेवक संजय धुमाळ, बाबा दांडेकर, नितीन पवार, विजय पैर, मियॉजान कादरी, प्रभाकर पाटील, पं. स. सदस्य अनंता ठाकूर, पप्पू भगत, शहर अध्यक्ष हसमुख जैन व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, सत्ता असो वा नसो निधीची कमतरता भासू देणार नाही. सर्व कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ठेवून एकत्रित पक्षासाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. नितीमत्ता ठेवल्यास, लोकांचा विश्वास आपणाबरोबर राहील. लोक चांगल्या माणसाला नेहमीच साथ देतात. शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असून येथे घड्याळाचा गजर झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अतिकभाई खतीब यांनी मुंबईला आता जास्त जावू नये, मुरुड शहरात राहून शहराची घडी व्यवस्थित हाताळावी अशी विनंती सूचना यावेळी केली. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी, शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे, स्मशानभूमी सुशोभिकरण, दत्त मंदिर निवासस्थान येथील कामे अर्धवट राहिली असून निधी उपलब्ध असून सुद्धा ही कामे पूर्ण न करता आल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)