शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘१०८’ची सेवा ठरतेय ‘संजीवनी’

By admin | Updated: January 16, 2017 06:25 IST

‘डायल १०८’ सेवेच्या रुग्णवाहिकांनी गेल्या तीन वर्षांत राज्यभरात १२ लाख जणांना ‘संजीवनी’ दिली आहे.

स्नेहा मोरे,

मुंबई- महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या (एमईएमएस) ‘डायल १०८’ सेवेच्या रुग्णवाहिकांनी गेल्या तीन वर्षांत राज्यभरात १२ लाख जणांना ‘संजीवनी’ दिली आहे. राज्यात पुणेखालोखाल सोलापूरकरांनी या सेवेचा सर्वाधिक लाभ घेतल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत राज्यात तब्बल १२ लाख ७७ हजार ९१६ नागरिकांना या सेवेचा फायदा झाला आहे. यातील २०१६ या वर्षांत सर्वाधिक म्हणजे, ७७ हजार २१४ नागरिक पुण्याचे तर त्या खालोखाल ६२ हजार ३४ नागरिक सोलापूरचे आहेत.अपघात झाल्यानंतर सुरुवातीची २० मिनिटे महत्त्वाची ठरतात, हे लक्षात घेऊन व्हेंटिलेटर, डी-फेब्रिलेटर कम मॉनिटर, इलेक्ट्रिक सक्शन, सीरिंज पंप, स्ट्रेचर, महत्त्वाची औषधे, डिलिव्हरी किट, ग्लुकोमीटर, व्हिलचेअर आदी ४२ अद्ययावत उपकरणे असलेल्या ९३७ रुग्णवाहिका आहेत. रुग्णवाहिकेत तीन डॉक्टर व दोन चालक असे पाच जणांचे पथक असते. >डायल करा ‘१०८’रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकाने टोल फ्री १०८ हा नंबर डायल केल्यास तो कॉल सेंटरला जाऊन तेथून रुग्णाचे नाव, घटनास्थळ आदींची माहिती घेतली जाते. तेथून संबंधित ठिकाणी असलेल्या रुग्णवाहिकेच्या डॉक्टर व चालकाला घटनेची माहिती दिली जाते. त्यानंतर, अवघ्या २० ते ३० मिनिटांत ही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून रुग्णाला जवळच्या रुग्णालयात आणते.रुग्णवाहिकेद्वारे या सेवा मिळतात रस्ता अपघात, आपत्कालीन प्रसूती, नवजात बालकांसंदर्भात आजार, साथींचे आजार, नैसर्गिक आपत्ती (पूर, भूकंप), मानवनिर्मित आपत्ती (दंगल, गॅसगळती, आग), अत्यवस्थ हृदयविकार, सर्पदंश, अन्न विषबाधा, भाजलेले रुग्ण, श्वसन संस्थेचे आजार, मेंदूचे आजार.‘अँड्रॉइड अ‍ॅपची सोय’ : १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचा वापर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर केला जातो, आता या सेवेचा लाभ अँड्रॉइड अ‍ॅपद्वारेही नागरिकांना घेता येतो. त्यामुळे आता नव्या वर्षात अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे, असे ‘एमईएमएस’चे प्रमुख संचलन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले.