शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

10,500 निलंबित कर्मचाऱ्यांची परतीची वाट बंद; एसटी आगार प्रमुखांकडून रुजू करून घेण्यास नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 09:25 IST

ST bus employees : विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते रुजू न झाल्याने एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत.

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या ७० दिवसांपासून संपावर गेलेल्या एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांपैकी साडेदहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतच्या सुनावण्यांना हजर न राहिल्याने सातशे कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. या कारवाईनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी आगारात जाऊन रुजू करून घेण्याची विनंती करण्यास सुरूवात केली आहे. मात्र मध्यवर्ती कार्यालयाने याबाबतची सूचना दिली नसल्याने आगारप्रमुखांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची परतीची वाट बंद झाली आहे. 

विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते रुजू न झाल्याने एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे पतीची नोकरी गेली आहे. घरभाडे थकले आहे, त्यामुळे मी स्वखुशीने कामावर रुजू होण्यास गेले होते. मात्र सोशल माध्यमांवर गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली. त्यामुळे कामावर रुजू झाले नसल्याचे  मुंबई विभागातील महिला कर्मचाऱ्यानी सांगितले. 

२०४७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसवारंवार आवाहन करूनही कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी   महामंडळाची कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत ११००८ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून ७८३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे, तर २०४७  एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

आर्थिक अडचणी वाढल्यागेल्या काही दिवसापासून आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आम्ही वारंवार आगारात जाऊन रुजू करून घेण्याची विनंती केली. मात्र मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतची सूचना नसल्याचे सांगत आगारप्रमुखांनी रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. - निलंबित एसटी कर्मचारी, औरंगाबाद विभाग 

संपातील निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना तीन वेळा रुजू होण्याची संधी देण्यात आली होती. मात्र कर्मचारी रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. आता या निलंबित कर्मचाऱ्यांना रुजू होता येणार नाही.-  शेखर चन्ने, उपाध्यक्ष आणि  व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ 

टॅग्स :ST Strikeएसटी संप