शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांना हजार कोटी द्या, तरच शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के रक्कम; शेतकऱ्यांची फाइल रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 08:43 IST

राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ४५७ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाला आहे.

नितीन चौधरी पुणे : खरिपात २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम आगाऊ देण्यासाठी राज्यातील १८ जिल्ह्यांत अधिसूचना जारी करण्यात आली. मात्र, राज्य सरकारने विमा कंपन्यांना द्यायच्या दीड हजार कोटींपैकी केवळ पाचशे कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित एक हजार कोटी न दिल्याने विमा कंपन्यांनी ही आगाऊ रक्कम अजूनही शेतकऱ्यांना दिलेली नाही. 

राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ४५७ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे खरीप पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विम्यापोटी दिल्या जाणाऱ्या नुकसानभरपाईच्या २५ टक्के रक्कम अग्रीम देण्याचा केंद्र सरकारचा निकष आहे. 

१८ जिल्ह्यात अधिसूचना जारीसर्वेक्षण अहवालानंतर १८ जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली. एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना ही आगाऊ रक्कम देण्याचे आदेशही दिले. मात्र, ही रक्कम देण्यासाठी विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून १ हजार ५५१ कोटी रुपयांचा हप्ता देणे अपेक्षित होते.  राज्य सरकारने यापूर्वी केवळ ५०० कोटी रुपयांचा हिस्सा विमा कंपन्यांना दिला आहे. अजूनही १ हजार कोटी रुपयांचा हप्ता न दिल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जारी करून एक महिना संपत आला तरी शेतकऱ्यांना ही अग्रीम रक्कम मिळालेली नाही. 

निकष वेगळे असू शकतात

  1. २२ पैकी चार जिल्ह्यांमध्ये अजूनही अधिसूचना जारी झालेली नाही. त्यात नंदुरबार, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
  2. या जिल्ह्यांत वेगवेगळ्या महसूल मंडळांमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी हा निकष बदलू शकतो. 
  3. पीककापणी प्रयोगापूर्वी पंधरा दिवस अधिसूचना जारी करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अशी मदत मिळू शकत नाही.

 

दोन दिवसांत निर्णय? कृषी विभागाने हा हप्ता तातडीने द्यावा, यासाठी वित्त विभागाकडे यापूर्वीच प्रस्ताव दिला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात वित्त विभागाकडे पाठपुरावा केला असून, येत्या दोन दिवसांत हा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या सोमवारपासून अधिसूचना जारी झालेल्या जिल्ह्यांमध्ये २५ टक्के रक्कम मिळू शकणार आहे.