शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी पुनर्परीक्षार्थींना परीक्षेसाठी 100% अभ्यासक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 04:51 IST

शिक्षण मंडळ; नियमित विद्यार्थ्यांची २५ टक्के कपातीचा भाग वगळून परीक्षा

मुंबई : जे विद्यार्थी यंदा दहावी-बारावीच्या परीक्षांना नियमित व माेजके विषय घेऊन बसणार आहेत ते शासनाने अभ्यासक्रमात केलेल्या २५ टक्के कपातीचा लाभ घेऊन परीक्षा देऊ शकतील, तर पुनर्परीक्षार्थींना १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले. दहावी, बारावीच्या परीक्षा अवघ्या दोन ते दोन महिन्यांवर असताना अजूनही विद्यार्थी-पालकांमध्ये परीक्षांच्या अभ्यासक्रमाबाबत संभ्रम असल्याने शाळा मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या माहितीसाठी शिक्षण मंडळाकडून ही  माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.काेराेना संसर्ग व लाॅकडाऊनमुळे यंदा मार्च २०२० पासून राज्यातील ऑफलाईन शिक्षण बंद झाले. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी या अभ्यासातही विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. ऑनलाइन अभ्यास उशिराने सुरू   झाल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे अवघड झाले आहे. प्रत्यक्ष शिक्षण सुरू नसल्याने प्रात्यक्षिकांचा भाग समजून घेतानाही अडचणी येत असल्याचा नाराजीचा सूर विद्यार्थ्यांमध्ये आहे. मागील डिसेंबर महिन्यापासून राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने अर्ध्याच उपस्थितीत सुरू आहेत. पण, अजूनही मुंबई महापालिका क्षेत्रासारख्या शहरी भागात शाळा सुरू झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शासनाकडून दहावी, बारावी बोर्डांच्या परीक्षा जाहीर करण्यात आल्या आहेत.  त्यामुळे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्यात येऊ नयेत अशी मागणी विद्यार्थी तसेच पालकांकडून सातत्याने करण्यात येत हाेती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच विद्यार्थी व पालक यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र, पुढील दोन ते तीन महिन्यांत परीक्षा असून, या काळात  ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे व त्याची उजळणी घेणे शक्य नाही. तसेच कमी वेळात शिकविलेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना नीट आकलन होणे अशक्य असल्याचे मत मुख्याध्यापक संघटनांनी मांडले. संघटनांची ५० टक्के अभ्यासक्रम कपातीची मागणीअभ्यासक्रम पूर्ण शिकवून न झाल्याने नापास होण्याची चिंता अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. परिणामी, विद्यार्थी मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता लक्षात घेऊन अभ्यासक्रम आणखी २५ टक्के कमी करून ५० टक्के करावा, अशी मागणी मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.