शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १० हजार कामगार दिल्लीवर धडकणार - कामगार किसान संघर्ष रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 03:41 IST

केंद्र व राज्य शासनाकडून कामगार कायद्यात होणाऱ्या कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ५ सप्टेंबरला कामगार किसान संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : केंद्र व राज्य शासनाकडून कामगार कायद्यात होणाऱ्या कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ५ सप्टेंबरला कामगार किसान संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू)चे उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड म्हणाले की, सीटू किसानसभा आणि शेतमजूर युनियनच्या वतीने कामगार व शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी ५ लाख कष्टक-यांचा मोर्चा दिल्लीमध्ये काढण्यात येईल. पूर्वीच्या काँग्रेस आणि सध्याच्या भाजपाप्रणीत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी व कामगार मेटाकुटीस आले आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने केंद्र व राज्य सरकारने पाळलेली नाहीत. त्यामुळे कामगार, शेतकरी, मजूर यांच्या सर्व प्रश्नांनी भीषण स्वरूप धारण केले आहे. याचाच जाब विचारण्यासाठी व कामगार कायद्यांतील बदलांविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्यात येईल.रॅलीच्या माध्यमातून सध्याच्या कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, कायद्यातील प्रस्तावित कामगारविरोधी व मालकधार्जिणे बदल रद्द करा, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण मागे घ्या, कंत्राटी कामगारांना कायम करा, समान कामाला समान वेतन व भत्ते द्या, आदी मागण्या सरकारपुढे ठेवण्यात येतील. याशिवाय बेरोजगारांना काम, दरमहा ३ हजार निर्वाह भत्ता, बंद उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले जाईल. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा धरून आधारभूत भावाची हमी आदी मागण्यांसह शेतकरी, शेतमजूरही रॅलीत सामील होतील.‘१० हजारांहून जास्त कामगार सहभागी होणार’रॅलीच्या तयारीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कामगारांचे मेळावे घेऊन जागृती केली आहे. कामगार वर्गाच्या जिव्हाळ्याच्या ३६ प्रश्नांवर प्रचाराचे मुद्दे, ६ पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे किमान १० हजारांहून जास्त कामगार या मोर्चात सहभागी होण्याची आशा संघटनेने व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र