शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रासह १० प्रदूषण मंडळ अध्यक्षांना काम करण्यास मनाई

By admin | Updated: June 14, 2017 01:56 IST

राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या आदेशानुसार किंवा नियमानुसार ‘आवश्यक अर्हता’ धारण करीत नसलेल्या महाराष्ट्रासह देशातील १० राज्य प्रदूषण नियंत्रण

- प्रभुदास पाटोळे । लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या आदेशानुसार किंवा नियमानुसार ‘आवश्यक अर्हता’ धारण करीत नसलेल्या महाराष्ट्रासह देशातील १० राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या अध्यक्षांना काम पाहण्यास नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने ८ जूनच्या आदेशान्वये मनाई केली आहे. संबंधित अध्यक्षांच्या (चेअरमन) नियुक्त्या राजकारणी व अधिकाऱ्यांनी केल्याचे निरीक्षण न्यायाधीकरणाचे न्यायमूर्ती रघुवेंद्र एस. राठोड आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. सत्यवानसिंग गरब्याल यांनी नोंदविले आहे. महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, सिक्कीम, तामिळनाडू, उत्तराखंड, केरळ, राजस्थान, तेलंगण, हरियाणा आणि मणिपूरच्या राज्य प्रदूषण मंडळांचा यात समावेश आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी ४ जुलै रोजी होणार आहे. आवश्यक अर्हता धारण करीत नसलेल्यांना मंडळांचे चेअरमन म्हणून काम पाहण्यास मनाई का करू नये, अशा कारणेदर्शक नोटिसा न्यायाधीकरणाने ३० मे २०१७ रोजी बजावल्या होत्या.तीन महिन्यांत नियुक्त्यांचा आदेशबहुतांश प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या चेअरमनच्या नियुक्त्या नियमानुसार झाल्या नसल्याबाबत राजेंद्रसिंग भंडारी यांनी अर्ज केला होता. असमाधानकारक उत्तर न्यायाधीकरणाच्या नोटिसांना काही मंडळांच्या अध्यक्षांनी उत्तर दाखल करून ते पदासाठी कसे पात्र आहेत, हे दर्शविण्याचा प्रयत्न केला; मात्र न्यायाधीकरणाने उत्तरावर असमाधान व्यक्त करीत उपरोक्त आदेश दिला आहे. ‘ते’सुद्धा पदावर काम पाहू शकणार नाहीतदिल्ली सरकार, दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळ, उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी विनंती केल्यानुसार नियम तयार करण्यासाठी त्यांना दोन महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यानंतर एक महिन्यात त्यांनी अध्यक्षांच्या नियुक्त्या कराव्यात. अन्यथा सध्या कार्यरत असलेले चेअरमनसुद्धा त्यांच्या पदावर काम पाहू शकणार नाहीत, असे न्यायाधीकरणाने स्पष्ट केले आहे.